कमबॅकनंतर अभिजीत सावंतची दमदार कामगिरी; तुझी चाल तुरु तुरुचा 15 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार!

Song Tuji Chaal Turu Turu sung by singer Abhijeet Sawant has crossed the 15 million views mark : गायक अभिजीत सावंतच्या गाण्याचा सिलसिला कायम बघायला मिळतोय आणि त्याला कारण देखील तितकच खास आहे ! यंदा अभिजीत सावंत इंडस्ट्री मधली 20 वर्ष पूर्ण करत असताना त्याने ” तुझी चाल तुरू तुरु ” या सदाबहार गाण्याचा खास रिमेक तयार केला होता आणि आता या गाण्याने 15 मिलियन व्ह्यूज चा टप्पा पार केला आहे.
सत्तेची पोळी भाजली! मराठा आरक्षणाच्या ‘जीआर’वरून रोहित पवारांनी सरकारलं घेरलं, आंदोलकांची फसवणूक…
इंडियन आयडॉल पासून अभिजीतच्या आवाजाची जादू ही आजही तितकीच आहे प्रेक्षक कायम त्याचा नवनवीन गाण्याला तितकंच प्रेम देतात आणि गाणं सुपरहिट करतात. तुझी चाल तुरु तुरु सारख्या जुन्या एव्हरग्रीन गाण्याला नवा आधुनिक टच देऊन हे गाणं त्याने सादर केलं आणि आता हे गाणं जगभरात ट्रेंड होतंय.
एसटीच्या जमिनींच्या विकासात श्रमिक संघटनांचा सहभाग आवश्यक – महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस
अभिजीत सांगतो ” जुन्या क्लासिक गाण्याला हा आधुनिक टच देऊन केलेलं हे गाणं आज प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि त्याला एवढं प्रेम दिलं हे बघून खरंच भारी वाटतंय. आजच्या काळात एखाद्या मराठी गाण्याला 15 मिलियन व्ह्यूज मिळणं ही खूप मोठी बाब आहे. प्रेक्षक आजही नवीन गाणी ऐकताना जुन्या क्लासिक गाण्याला दिलेला नवीन ट्विस्ट ऐकतात त्याला एवढं प्रेम देतात म्हणून प्रेक्षकांचे खूप खूप आभार”
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी कर्णधार दुखापतीमुळे बाहेर
अभिजीत सावंत गायन विश्वात त्याची 20 वर्ष एवढ्या ट्रेंडिंग पद्धतीने साजरी करत असताना सोबतीला अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स मधून देखील तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय.