Download App

संभाजी भिडेंना वक्तव्य भोवलं! आठ दिवसांत पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश…

Sambhaji Bhide contraversy : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना वादग्रस्त वक्तव्य भोवलं आहे. अमरावतीमधील राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता भिडेंना आठ दिवसांत हजर राहण्याबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे. संभाजी भिडे यांच्यासह आयोजकांनाही नोटीस जारी करण्यात आली आहे. (sambhaji bhide ordered to appear before police within 8 days)

रेल्वेतील गोळीबार धार्मिक हिंसेतून नाहीतर, आरोपीने.., सरकारी सुत्रांनी केला दावा…

27 जुलै रोजी अमरातीवतीमधील एका मंगल कार्यालयात संभाजी भिडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं होतं. त्यावेळी त्यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या विधानानंतर राज्यसभरातून संताप व्यक्त करण्यात आला. विधानसभेतही विरोधकांकडून त्यांच्या विधानावर आक्षेप घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नितीन देसाई यांची एक्झिट मनाला चटका लावणारी ; राजकीय नेत्यांकडून हळहळ !

संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांना पुढील आठ दिवसांत पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वादग्रस्त विधानामुळे भिडेंवर राज्यातील विविध जिल्ह्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे अमरावतीत वर्ग करण्यात आले असल्याची माहिती पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे.

राज्यात कोरोनाची रिएंट्री! रुग्णांची संख्या शंभरीकडे, मुंबई-पुण्यात सर्वांधिक रुग्ण

तसेच संभाजी भिडे यांच्या वक्तव्याच्या ऑडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. अमरावतीतल्या एका कार्यक्रमात केलेल्या विधानानंतर लोकांमध्ये असंतोष पसरवून विविध समाजातील लोकांमध्ये वाद वाढवण्याचं भाष्य भिडे यांनी केलं.

अयोध्येत राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख ठरली, पंतप्रधान मोदींना मागितला वेळ

दरम्यान, संभाजी भिडे यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधी, यांच्यानंतर महात्मा फुले, राजाराम मोहन रॉय, साईबाबांवर विधान केलं होतं. या प्रकरणी तक्रारीवरुन संभाजी भिडे, निशांतसिंह जोध, अविनाश मरकल्ले, यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनाही हजर राहण्याबाबत नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पुढील दिवसांत संभाजी भिडे पोलिस ठाण्यात हजर राहणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून संभाजी भिडे राज्यभर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा हिंदुत्ववादी संघटनांना अभिप्रेत असलेला इतिहास ते सांगत असतात. ते राज्यातील तरुणांना मार्गदर्शन करीत असतात. गड किल्ल्यांच्या मोहिम आखत ते तरुणांना घेऊन किल्ले सर करीत असतात. याआधी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधान केलेली आहेत. वादग्रस्त विधानानंतर ते आपल्या दाव्यावर ठाम राहिल्याचं दिसून आले आहे. त्यामुळे आता या विधानानंतर संभाजी भिडे कोणती भूमिका घेणार? याकडं सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

Tags

follow us