Download App

6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष करा; संभाजी भिडेंचं मोठं वक्तव्य…

Sambhaji Bhide On Shivarajyabhishek Ceremony On 6 June : रायगडावर किल्ल्यावरील 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा (Shivarajyabhishek Ceremony) कायमस्वरूपी नामशेष करायला पाहिजे, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी (Sambhaji Bhide) केलंय. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत आहे, असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यांनी कोल्हापुरात बोलताना शिवराज्यभिषेक दिनावर भाष्य केलंय.

6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन आहे. याच पार्श्वभूमीवर वाघ्या कुत्र्‍याचा मुद्दा पुन्हा समोर येतंय. यावर संभाजी भिडे यांनी म्हटलंय की, रायगडावरून तो वाघ्या कुत्र्‍याचा पुतळा काढता कामा नये. तो राजकारणाचा विषय करता कामा नही. 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा करण्याची पद्धत नामशेष केली पाहिजे. आपण 76 वर्ष झाली तरी
आपलं मानसिक सगळं अधिष्ठान ब्रिटिशांकडे स्वाधीन ठेवलंय. महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या तिथीप्रमाणेच शिवराज्याभिषेक स्मरण दिन साजरा केला पाहिजे. ६ जूनचा बंद केला पाहिजे, असं संभाजी भिडे यांनी म्हटलंय.

हगवणे कुटु्ंबियांना मकोका लागणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं..

कुत्र्‍याच्या समाधीवर बोलताना संभाजी भिडे यांनी म्हटलंय की, गोष्ट अशी की, जे कुत्र्‍याची समाधी नको म्हणतात ते इतिहास संशोधक म्हणतात, ते काय उंचीचे, काय कुवतीचे? याचा आपण विचार केला पाहिजे. यासाठी एखादं संशोधक मंडळ स्थापून निर्णय घ्यावा असं देखील त्यांनी म्हटलंय. राजकीय लोकांच्या वक्तव्याला आपण इतिहास संशोधक म्हणतोय, असं देखील संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

Video : अंजली दमानियांकडून पवार कुटुंबावर ट्वीट’वार; करिश्मा हगवणेबरोबर सुनेत्रा पवार अन्…

संभाजीराजे छत्रपती यांनीरायगडावर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी 31 मे पर्यंत हटवा अशी मागणी करणारं पत्र दिलं आहे. तर दुसरीकडे या श्वानाबाबत इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी देखील अत्यंत माहिती दिली आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात यावी, ही मागणी याअगोदर सुद्धा शिवप्रेमींनी केली होती. परंतु अजून रायगडावरून वाघ्या कुत्र्‍याची समाधी हटवण्यात आलेली नाही. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्र लिहून ही समाधी कपोलकल्पित असून ती 31 मे पर्यंत हटवावी, अशी मागणी केलेली आहे.

 

follow us