Dhangar reservation: धनगर समाजाला महायुतीच आरक्षण देणार; संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विश्वास

शरद पवारांनी मधुकर पिचड यांना हाताशी धरून धनगर व धनगड असा तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला.

Dhangar reservation: धनगर समाजाला महायुतीच आरक्षण देणार; संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विश्वास

Dhangar reservation: धनगर समाजाला महायुतीच आरक्षण देणार; संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विश्वास

Sambhaji Patil Nilangekar : महायुती सरकारनेच धनगर समाजाचा सन्मान केला आहे. (Sambhaji Patil) आरक्षणाचा प्रश्नही महायुती सरकारच निकाली काढेल. सरकार आल्यानंतर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल, असा विश्वास संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे. वलांडी येथील संगमेश्वर मंगल कार्यालयात निलंगा मतदारसंघातील धनगर समाजाचा मेळावा बुधवारी संपन्न झाला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

निलंगेकर म्हणाले की, मुघल सरकारने हिंदू संस्कृती मोडून काढली. ती जतन करण्याचे काम अहिल्यादेवी होळकर यांनी केले. स्वातंत्र्यानंतर 60 वर्षात काँग्रेसला त्यांचा सन्मान करता आला नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचा योग्य तो सन्मान केला. राज्य सरकारनेही सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले तर अहमदनगरचे नाव बदलून ते अहिल्यानगर करण्यात आल्याचं निलंगेकर म्हणाले.

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने धनगर आरक्षण याचिका फेटाळली; हायकोर्टाचा निर्णय ठेवला कायम

शरद पवारांनी मधुकर पिचड यांना हाताशी धरून धनगर व धनगड असा तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला. ही चूक महायुती सरकारने दुरुस्त केली. त्यामुळे आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या संदर्भात मी विधानसभेतही आवाज उठवला होता.भविष्यात महायुती सरकारच सत्तेत येणार असून या समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लागेल, असंही ते म्हणाले.

निलंगा मतदारसंघात समाजाला योग्य तो सन्मान देण्याचं काम आपण केलं आहे. या समाजाला राजकीय पाठबळ दिलं. निलंग्याच्या नगराध्यक्षपदी बाळासाहेब शिंगाडे, पंचायत समितीचे सभापती म्हणून शिवाजीराव चेंडकापुरे, लातूरच्या उपमहापौरपदी देविदास काळे यांना संधी दिली. यापुढे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मतदारसंघातील गौडगाव येथे अहिल्यादेवींचा पुतळा उभारला. केळगाव व देवणी तालुक्यातील धनगरवाडी येथे लवकरच पुतळे उभारले जाणार आहेत. असं आश्वासनही निलंगेकर यांनी दिलं.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विजयकुमार भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, विधानसभा प्रभारी दगडू सोळुंके, निलंग्याचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, देवणी तालुकाध्यक्ष काशिनाथ गरीबे, देवबा काळे, लक्ष्मण जागले, आण्णाराव गोबाडे, प्रकाश म्हेत्रे, प्रकाश कोटे, तुकाराम काळे, ब्रह्माजी भोसले, विजयकुमार जागले, नामदेव काळे, नागेश तरंगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version