Download App

विशाळगड तोडफोड प्रकरण, संभाजीराजे छत्रपती शाहूवाडी पोलीस ठाण्यात हजर

Sambhaji Raje Chhatrapati : गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावर (Vishalgarh) झालेल्या अतिक्रमणांचा वाद वाढत आहे. कोल्हापुरचे युवराज संभाजीराजे

  • Written By: Last Updated:

Sambhaji Raje Chhatrapati : गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणांचा वाद वाढत आहे. कोल्हापुरचे युवराज संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी या अतिक्रमणांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे आणि विशाळगडाच्या (Vishalgarh) दिशेने कूच करण्याचा इशाराही दिला होता.

तर रविवारी काही शिवभक्तांनी विशाळगडावरील अतिक्रमणांविरोधात तोडफोड केली होती. त्यामुळे परिसरात तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांनी तब्बल 500 हून अधिक लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. तर काहींना अटक देखील केली आहे.

तर दुसरीकडे पोलिसांनी केलेल्या या कारवाई विरोधात कोल्हापुरचे युवराज संभाजीराजे छत्रपती संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यानंतर शाहूवाडी पोलिसांनी (Shahuwadi Police) या प्रकरणात संभाजीराजे छत्रपती यांच्यावर कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या प्रकरणात संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा. जय शिवराय ! असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.

माहितीनुसार, संभाजीराजे छत्रपती हे शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले असून पोलिसांनी केलेल्या कारवाईवर त्यांनी पोलिसांसोबत चर्चा केली. यानंतर शाहूवाडी पोलिसांनी या प्रकरणात संभाजीराजे छत्रपती यांच्यावर देखील कारवाई करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर दुसरीकडे शाहूवाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आज पत्रकार परिषद घेत संभाजीराजे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. या पत्रकार परिषदेमध्ये संभाजीराजे म्हणाले, 158 पैकी सात आणि सहा हे दोनच अतिक्रमण न्यायप्रविष्ठ आहेत, मग तुम्ही बाकीचे अतिक्रमण का काढला नाही? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच आज तुम्ही अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेत आहे मग तुम्ही गेलं दीड वर्ष अतिक्रमण का काढलं नाही? असा देखील प्रश्न त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये प्रशासनाला विचारला.

तसेच जर माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर मी आत्ताच शाहूवाडी पोलीस स्टेशनला जातो. शिवभक्त येणार आहेत हे प्रशासनाला माहित होत तर त्यांनी आधीच निर्णय का दिला नाही असं देखील संभाजीराजे म्हणाले.

Sharvari Wagh: महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचे जबरदस्त मंडे मोटिवेशन, ‘अल्फा’च्या शूटिंगसाठी सज्ज

आम्हाला बैठकीचा निमंत्रण आलं होतं मात्र त्यांना आम्ही कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवाल हा प्रश्न विचारला मात्र प्रशासनाने कोणताही उत्तर नव्हता असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये संभाजीराजे म्हणाले.

follow us