Download App

Gautami Patil : “अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण”; संभाजीराजे छत्रपतींचा 24 तासांच्या आत युृ-टर्न;

नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यासंदर्भात (Gautami Patil) घेतलेली भूमिका माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी 24 तासांच्या आतच बदलली आहे. गौतमी पाटीलला संरक्षण दिलं पाहिजे, अशी भूमिका माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी घेतली होती, आता मात्र, त्यांनी भूमिका बदलत “अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण” असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

अँड्रॉइड युजर्संनो सावधान! ‘हा’ व्हायरस कॉल रेकॉर्ड, संपर्क, ब्राउझिंग हिस्ट्री चोरतो

पोस्टमध्ये संभाजीराजे छत्रपती म्हणतात, “काल एका पत्रकाराने एका महिलेचा “कलाकार” असा उल्लेख करत, तिला त्रास व धमक्या दिल्या जात आहेत म्हणत मला प्रतिक्रिया विचारली. मला त्या व्यक्तीची व तिच्या कलेची काहीही माहिती नव्हती.

महिला कलाकाराला धमक्या येणे हे चुकीचे समजून मी बोलून गेलो की कलाकारांना संरक्षण दिले पाहिजे. मात्र, आज त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर आश्चर्याने या कलाकाराची “कला” मी बघितली. आता असे वाटत आहे, महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण” असं म्हणाले आहेत.

IPL 2023 Final CSK vs GT: धोनीच्या प्रेमात चाहत्यांनी घालवली स्टेशनवर रात्र, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

काय म्हणाले होते संभाजीराजे छत्रपती?
महिलांनी आपले गुण व कृतृत्व दाखवायालव पाहिजे. त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे. तसेच पाटील हे आडनाव मराठा समाजातच नाही तर अनेक समाजामध्ये लावले जाते. ते आडनाव नसून तो एक किताब आहे. त्यामुळे तो अनेक समाजाला मिलालेला असलेल्याने ते आडनाव म्हणून लावले जाते. त्यामुळे कालाकारांना सुरक्षा मिळाली पाहिजे.

दरम्यान, आपल्या नृत्याने आणि अदाकारीने लोकांना घायाळ करणारी गौतमी पाटील नेहमीच लोकांच्या चर्चेत राहिली. गौतमी पाटील वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या आडनावावरुन जोरदार वाद निर्माण सुरु आहे. गौतमीमुळे पाटील आडनावाची बदनामी होते. त्यामुळे तिने पाटील आडनाव वापरु नये, अशी मागणी मराठा संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यावरुन काहींनी गौतमी पाटीलचं समर्थन केलंय तर काहींनी विरोध दर्शवला आहे.

Tags

follow us