अँड्रॉइड युजर्संनो सावधान! ‘हा’ व्हायरस कॉल रेकॉर्ड, संपर्क, ब्राउझिंग हिस्ट्री चोरतो

अँड्रॉइड युजर्संनो सावधान! ‘हा’ व्हायरस कॉल रेकॉर्ड, संपर्क, ब्राउझिंग हिस्ट्री चोरतो

Android user beware of Daam monster, takes control of call records, contacts, browsing history : अँड्रॉइड डिव्हाईसमध्ये (Android devices) व्हायरस (virus) सहजासहजी जात नाही. मात्र, काही अॅप्स असे आहेत, जे डिव्हाईसमध्ये डाऊनलोड करताच Android डिव्हाईस मध्ये व्हायरस घुसतो. हा व्हायरस तुमच्या स्मार्टफोनची गती कमी करतो आणि तुमची खाजगी आणि वैयक्तिक माहिती देखील धोक्यात आणतो. त्यामुळं Android वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण एक व्हायरस आढळला आहे, जो तुमच्या फोनचे कॉल रेकॉर्ड, संपर्क माहिती, फोन हिस्ट्री आणि कॅमेरा डेटा चोरतो.

नॅशनल सायबर सिक्युरिटी एजन्सीने या व्हायरसची माहिती देणारी एक अॅडव्हायझरी जारी केली आहे, ज्याला ‘Daam’ असे नाव देण्यात आले आहे. CERT-In ने म्हटले आहे की हा धोकादायक विषाणू अँटीव्हायरस प्रोग्राममधून देखील निसटतो आणि Android डिव्हाईसवर रॅन्समवेअरने हल्ला करतो.

IPL 2023 Final: नाणेफेक जिंकून चेन्नईची प्रथम गोलंदाजी, अशी आहे प्लेइंग 11

एजन्सीचे म्हणणे आहे की जेव्हा एखादे अॅप अज्ञात स्त्रोतावरून डाउनलोड केले जाते, तेव्हा Android botnet प्रसारित होते. अॅडव्हायझरीनुसार, ‘ हा व्हायरस डिव्हाइसमध्ये प्रवेश केल्यानंतर, मालवेअर डिव्हाइसच्या सुरक्षा तपासणीला बायपास करण्याचा प्रयत्न करतो आणि यशस्वी प्रयत्नानंतर, तो संवेदनशील डेटा चोरण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये तो सर्च हिस्ट्री, कॉल्स, फोनचा कॅमेरा आणि बुकमार्क या प्रकारचा डेटा चोरतो.

‘दाम’ व्हायरस फोन कॉल रेकॉर्डिंग, संपर्क, कॅमेरा, डिव्हाइस पासवर्ड बदलणे, स्क्रीनशॉट घेणे, एसएमएस चोरणे, फाइल डाउनलोड आणि अपलोड करणे, असंही करू शकतो.

एजन्सीने सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला

एजन्सीने ‘अनधिकृत वेबसाइट्स’वर क्लिक करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे आणि ‘अँटी-व्हायरस’ आणि ‘अँटी-स्पायवेअर’ सॉफ्टवेअर डाउनलोड करू नयेत असेही सांगितले आहे. तसेच, कोणत्याही ‘संशयास्पद नंबर’वरून येणारे फोन कॉल्स किंवा मेसेज याबाबत काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.

अज्ञात किंवा गैर-HTTP लिंक उघडू नका. बिटली (bitly) किंवा टिनी यूआरएल (tinyurl) लिंक उघडू नका. यामुळे तुमच्या फोनमध्ये व्हायरस येऊ शकतो, असं या एजन्सीजने सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube