Samruddhi Highway Accident Three Seriously Injured : राज्यात बुधवारी दोन राजकीय नेत्यांचे भीषण अपघात झाल्यानंतर आज देखील राज्यातील समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Highway Accident ) अपघातांची मालिका कायम आहे. समृद्धी महामार्गावर मुंबई कॅरिडॉर वरील चेनेज 301 जवळ भीषण ( Accident) अपघात झाला.
Elon Musk पहिल्यांदाच भारतात येणार; ट्विट करत मोदींच्या भेटीबाबत व्यक्त केली उत्सुकता
भरधाव कार ट्रकवर जोरात धडकल्याने या अपघातामध्ये तिघेजण गंभीर जखमी ( Three Seriously Injured ) झाले आहेत. या तिघांवर सुरूवातीला बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या ठिकाणी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यानंतर यातील दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे कर्क राशीचा आजचा दिवस
तर समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातामध्ये ट्रक चालकाने अचानक लेन बदलल्याने मागून येणारी भरधाव कार ही या ट्रकवर यामुळे हा भीषण अपघात घडला आहे. दरम्यान समृद्धी महामार्गावर ट्रक चालक कुठलाही इशारा न देता अचानक लेन बदलत असतात. त्यामुळे या महामार्गावर वारंवार असे अपघात घडले च्या घटना समोर येत आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कारला अपघात…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कारला मंगळवारी रात्रीच्या सुमारास अपघात झाला. प्रचारसभेवरुन परत येत असतानाच पटोलेंच्या ताफ्यातील कारचा अपगात झाला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेला जाताना आज (10 एप्रिल) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कन्हान जवळ रामटेकचे शिवसेनेचे (Shivsena) सहयोगी आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला.