Download App

Accident : 26 जणांचा जीव घेणाऱ्या भागात सर्वाधिक अपघात; पिंपळखुटा हा अ‍ॅक्सिडेंट स्पॉट का बनलाय?

प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार बस डिव्हायडरला धडकून डिझेल टँक फुटल्याने बसने पेट घेतला आणि 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. (Samruddhi highway Vidarbha travels bus accident Buldhana 26 died)

दरम्यान, या अपघातानंतर समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा – पिंपळखुटा हा अ‍ॅक्सिडेंट स्पॉट बनला आहे का? असा सवाल विचारला जात आहे. समृद्धी महामार्गावर हे ठिकाण धोकादायक का बनले याविषयी बुलढाणाचे माजी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना माहिती दिली. शिंगणे म्हणाले “ मी याच महामार्गाने प्रवास करतो. मला काही गोष्टी कायम खटकतात, त्या निदर्शनात आणतो. आता तर मी अधिवेशनात हा विषय मांडण्यासाठी माहिती गोळा करत आहे.”

Breaking : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, खासगी बसला आग लागून 26 प्रवाशांचा मृत्यू

शिंगाणे पुढे म्हणाले की, समृद्धी महामार्गावर नागपूर-मुंबई दोन्ही बाजूने समान अंतरावर सिंदखेडराजा हे बरोबर मध्यवर्ती ठिकाण आहे. यात जालना ते दुसर्बीड दरम्यान पिंपळखुट, शिवनी मीना या भागात सर्वाधिक अपघात झाले आहेत. या ठिकाणी अतिवेगाने वाहने येतात. अनेक वाहनांचा स्पीड हा दीडशेपेक्षा जास्त असतो. पण अचानक या ठिकाणी मध्ये काही छोटे पूल आहेत. तर सिंदखेडला जाण्यासाठी बाहेर पाडण्याचा मार्ग आहे. यामुळे स्पीडवर अचानक नियंत्रण येते.

या महामार्गार गस्ती पथक देखील तुरळक आहेत. त्याच प्रमाणे 2 टोलच्या दरम्यान रुग्णवाहिकांची संख्या देखील कमी आहे. याशिवाय थांबण्याची ठिकाणे नसल्याने सतत प्रवास होतो. या महामार्गावर शिर्डीपासून ते नागपूरपर्यंत कुठेही हॉटेल नाहीत. टोल प्लाझा वाटपात अनेक वाद असल्याने ते सुरु होऊ शकले नाहीत. त्यामुळे गाडी थांबवण्यासाठी कुठेही जागा नाही. तसेच महामार्गावर कुठेही गाडी थांबवण्यास मनाई आहे. यामुळे चालकाला सतत गाडी चालवावी लागते. यामुळे डुलकी लागण्याची शक्यता अधिक बळावते. ती अपघातला कारणीभूत ठरते, असे शिंगणे यांनी सांगितले.

सिमेंट रोड, अतिवेग आणि भीतीचे वातावरण :

समृद्धी महामार्ग अस्तित्वात आला त्या दिवसापासून अपघातला सुरुवात झाली आहे. पहिला अपघात टायर फुटून झाला. या महामार्गावर झालेले 80 टक्के अपघात टायर फुटून झाले आहेत. सिमेंट रत्यावर अतिवेगमुळे टायर घर्षण होऊन टायर फुटण्याचे प्रमाण अधिक आहे. एवढा अपघात होऊनही तात्काळ मदतीसाठी या ठिकाणी कोणी नाही. हा संपूर्ण महामार्ग निर्मनुष्य आहे.

बसमधील प्रवाशांची नावं आली समोर ; 26 जणांचा मृत्यू 8 सुखरुप…. बसचा केवळ सांगाडाच उरला…

गेल्या काही महिन्यापासून जालना ते सिंदखेड राजा तसेच छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने काही अंतरावर वाहनावर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का? दरोडे टाकण्याचे प्लॅनिंग आहे का? ही भीती कायम या भागात असते. त्यामुळे वाहनं या भागात थांबत नाही. याबाबत आपण पोलिसांना कळवले आहे, असेही शिंगाने यांनी सांगितलं.

विकास झाला पाहिजे हे मान्य आहे. पण तो विकास लोकांच्या जिवावर उठणारा नको. या महामार्गाच्या अपघातच्या मालिकांची सखोल चौकशी करुन उपाययोजना झाल्या पाहिजे असही शिंगाणे यांचे म्हणणे आहे.

Tags

follow us