Download App

Buldhana Bus Accident : ‘RTOचे अधिकारी ऑफिसमध्येच मग्न’; विखेंनी सुनावले खडेबोल

Samrudhdhi Highway Accident :  समृद्धी महामार्गावर बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते, त्यातील 8 प्रवासी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. हे 8 जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर सिंदखेडराजा येथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरटीओच्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

विदर्भातील घडलेली घटना दुर्दैवी असून खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना नियमावली असणे आवश्यक आहे. खाजगी ट्रॅव्हलच्या बसेसला नियमित करण्यावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यांनाही नियम आणि निकष लागू झाले पाहिजे. खरंतर प्रामुख्याने या गाड्यांची तपासणी करण्याचं काम हे आरटीओचे असते. मात्र, आरटीओचे अधिकारी ऑफिसमध्येच काम करण्यात व्यस्त असतात, असे म्हणत त्यांनी आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.

Video : अपघातानंतर सर्व यंत्रणा वेळेत पोहोचल्या पण…; बुलढाणा अपघातानंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

आरटीओचे सगळे काम ऑनलाईन झालेले आहे. मग आरटीओचे अधिकारी रोड वरती येऊन गाड्यांची तपासणी का करत नाही? असा प्रश्न विखे यांनी उपस्थित केला. त्यामुळे येणाऱ्या काळात यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आरटीओचे मुख्य काम हायवेवर थांबणं आहे. हायवेवर वाहतुकीची सुरक्षितता पाळली जाती की नाही याकडे लक्ष देणं, हे आरटीओचे प्रमुख काम आहे. पण हायवेवर आज कोणी सापडत नाही. त्यामुळे त्यांच्या कामकाजात बदल करण्याची गरज आहे, असे विखे म्हणाले.

Maharashtra Rain Alert : राज्यात उद्यापासून मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळावरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,  अपघातानंतर सर्व यंत्रणा घटनास्थळी वेळेत पोहोचल्या मात्र बसचा दरवाजा बंद असल्यामुळे प्रवाशांना बाहेर येता आलं नाही, नाहीतर आणखी लोकं वाचले असते. तसेच समृद्धी महामार्गावर होणारे सर्वाधिक अपघात हे मानवी चुकांमुळे, चालकांच्या चुकीमुळे त्याचबरोबर चालकांना डुलक्या लागल्यानेच होत असल्याचे, शिंदे म्हणाले.

Tags

follow us