Maharashtra Rain Alert : राज्यात उद्यापासून मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert : राज्यात उद्यापासून मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

Mharashtra Rain Alert : महाराष्ट्रात यंदा मान्सून (Monsoon) उशीराने दाखल झाला. मान्सूनच्या आगमनाची घोषणा 25 जून रोजी झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी पुणे, मुंबई अन् राज्यातील बहुतांश भागात पाऊस सुरू झाला. या पावसाच्या आगमनाने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. तर बळीराजा सुखावला असून अनेक भागांत पेरणीची लगबग सुरू झाली. तरी अद्याप देखील अनेक ठिकाणी पेरणीच्या योग्य पाऊस पडला नसल्याचं चित्र आहे. त्यामध्ये आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. ( Maharashtra Rain Update yellow Alert for many districts )

उद्या रविवार 2 जुलैपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पावसाची अद्याप देखील प्रतिक्षा असताना दिलासा मिळणार एवढं नक्की. त्यामध्ये हवामान विभागाने कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

दरम्यान सध्या राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईसह कल्याण, ठाणे जिल्ह्यांत मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु होता. दरवर्षी जून महिन्यात राज्यात सरासरी 209.8 मिमी पाऊस होत असतो. मात्र यंदा 1 जून ते 30 जून दरम्यान केवळ 113.4 मिमीच पाऊस झाला आहे. त्यानंतर आता राज्यातील अनेक भागांत पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पावसाचा यलो अलर्ट म्हणजे काय?
हवामान विभागाकडून देश आणि राज्यासाठी हवामानाचा अंदाज वर्तवला जातो. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना हवामानाची माहिती अगोदर मिळाल्याने शेती विषयी पुढील नियोजन करायला मदत होते. त्यामध्ये हवामान विभाग प्रत्येक भौगोलिक क्षेत्रानुसार हा अंदाज वर्तवला जातो. तसेच यामध्ये यलो, रेड, आणि ऑरेंज अलर्ट देखील दिला जातो. त्यामध्ये यलो अलर्ट म्हणजे संबंधित भागामध्ये नैसर्गिक संकटाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध रहावे अशा सूचना देखील दिल्या जातात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube