Video : अपघातानंतर सर्व यंत्रणा वेळेत पोहोचल्या पण…; बुलढाणा अपघातानंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Video : अपघातानंतर सर्व यंत्रणा वेळेत पोहोचल्या पण…; बुलढाणा अपघातानंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Eknath Shinde On Samruddhi Highway Accident : बुलढाणा (Buldhana)जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास भीषण अपघात (Big Accident)झाला. त्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची भीषणता पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याचबरोबर अपघातानंतर सर्व यंत्रणा घटनास्थळी वेळेत पोहोचल्या मात्र बसचा दरवाजा बंद असल्यामुळे प्रवाशांना बाहेर येता आलं नाही, नाहीतर आणखी लोकं वाचले असते, असेही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. (samruddhi highway accident cm eknath shinde said most accidents are due to human error)

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला. त्याचबरोबर समृद्धी महामार्गावर होणारे सर्वाधिक अपगघात हे मानवी चुकांमुळेच, चालकांच्या चुकांमुळेच त्याचबरोबर चालकांना डुलक्या लागल्यानेच होत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर अपघात टाळण्यासाठी ज्या काही उपाययोजना आवश्यक असतील त्या सर्व केल्या जातील असेही यावेळी सांगितले.

सदोष निर्मिती अन् मानवी त्रुटींमुळे अपघात; अजित पवारांची समृद्धीवर सडकून टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या अपघाताची भीषणता लक्षात येत आहे. रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. खांबाला धडकून ही बस डिझलच्या टाकीचा स्फोट झाला. त्यात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातून आठ जणांना बाहेर काढलं आहे. अपघातातून आठ जण वाचले आहेत.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर

तातडीने जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या की, त्यांच्यावर चांगले उपचार करा, तशा प्रकारची कारवाई सुरु झाली. पण 25 लोकांना वाचवता आलं नाही. त्यामुळे आपण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलो असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

समृद्धी हायवेवर जे अपघात झाले, त्याच्यामध्ये दुर्दैवाने जास्तीचे अपघात मानवी चुकांमुळे, चालकाच्या चुकांमुळे, झोप लागते, या सर्वांमुळेच हे अपघात होताना दिसत आहेत. आता मात्र हे असे अपघात होऊन चालणार नाही. त्यामुळे सरकारने हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहेत. त्यामुळे या ठिकाणी जे जे करणं आवश्यक आहे, त्या सर्व उपाययोजना करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओव्हरस्पीडमुळे हे अपघात होत आहेत का असा सवाला केला, त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ट्रॅव्हल्स असेल, ड्रायव्हर असेल त्यांच्या प्रवाशांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याची जबाबदारी ही त्यांची असते. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करण्याची गरज आहे. पण काहीवेळा ते पाळताना दिसत नाही. ओव्हरस्पीडसाठी काऊन्सीलिंग केलं जात आहे. अनेकजण त्यामुळे नाराजही होतात. मात्र ते आपल्याकडून केले जाते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube