सदोष निर्मिती अन् मानवी त्रुटींमुळे अपघात; अजित पवारांची समृद्धीवर सडकून टीका

सदोष निर्मिती अन् मानवी त्रुटींमुळे अपघात; अजित पवारांची समृद्धीवर सडकून टीका

Ajit Pawar On Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर नागपूरहून (Nagpur)मुंबईकडे (Mumbai)निघालेल्या बसचा भीषण अपघात झाला आहे. त्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी शोक व्यक्त केला आहे.

त्यातच आता या भीषण अपघातावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे. समृद्धी महामार्गाची सदोष निर्मिती आणि मानवी त्रुटींमुळेच हे अपघात घडत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे.(Samruddhi highway Accident Ajit Pawar said Defective production and Accidents due to human error )

26 जणांचा जीव घेणारा अपघात कसा घडला? वाचलेल्या प्रवाशांनी सांगितला शहारे आणणारा घटनाक्रम

अजित पवार यांनी ट्वीट करत या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलढाणा-सिंदखेडराजा येथे अपघात होऊन 25 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्यानं बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसनं पेट घेतला.

बसमधील प्रवाशांची नावं आली समोर ; 26 जणांचा मृत्यू 8 सुखरुप…. बसचा केवळ सांगाडाच उरला…

या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षानं ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनानं तज्ञांच्या सल्ल्यानं यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

26 जणांचा जीव घेणारा अपघात कसा घडला? वाचलेल्या प्रवाशांनी सांगितला शहारे आणणारा घटनाक्रम

आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेतील जखमी प्रवाशांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो.

समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे.

यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या वतीनं सातत्यानं करण्यात आली आहे. शासनानं आतातरी या मागणीचा गांभीर्यानं विचार करावा, अशी मागणी करतो, असंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube