26 जणांचा जीव घेणारा अपघात कसा घडला? वाचलेल्या प्रवाशांनी सांगितला शहारे आणणारा घटनाक्रम

26 जणांचा जीव घेणारा अपघात कसा घडला? वाचलेल्या प्रवाशांनी सांगितला शहारे आणणारा घटनाक्रम

Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरुच आहे. त्यातच आता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा समृद्धी महामार्गावरील हा सर्वात मोठा अपघात असल्याचे म्हटले जात आहे. ही बस नागपूरवरुन (Nagpur) मुंबईकडे (Mumbai)निघाली होती. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते, त्यातील काही प्रवासी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. त्यातील काही प्रवाशांनी हा अपघात नेमका कसा घडला? त्यावेळी नेमकं काय घडलं? याची आपबीती सांगितली आहे.(Samruddhi highway Accident Passengers said how exactly did the accident happen?)

ब्रेकिंग न्यूज: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, खासगी बसला आग लागून 26 प्रवाशांचा मृत्यू

प्रवाशांनी सांगितले की, ही बस नागपूरमधून मुंबईकडे निघाली होती. रात्री जेवण करुन बसमध्ये बसलो, त्यानंतर जवळपास अर्ध्या तासाने बस रस्त्यावरील डिव्हायडरवर दुभाजकाला धडकली. त्यानंतर ही बस पलटली. बस पलटी झाल्यानंतर लगेच पेट घेतला. आपण 19 आणि 20 नंबरच्या सीटवर बसलो होतो. बस पलटी झाल्यानंतर आम्ही खाली पडलो. त्यानंतर आम्ही बसची खिडकी तोडली. त्यातून आपण बाहेर पडल्याचे प्रवाशांनी सांगितले.

फ्रान्समध्ये आणीबाणीची परिस्थिती! राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी बोलवली मंत्रिमंडळाची बैठक

बस पलटी झाल्यानंतर बसला लगेच आग लागली. त्यानंतर टायर फुटल्याचे प्रवाशांनी सांगितले. त्यानंतर डिझेलच्या टाकीचा मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण बसने आग लागली. अपघात झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यादेखील दाखल झाल्या. आग एवढी भयानक होती की, काही वेळातच संपू्र्ण बसने पेट घेतला आणि बस पूर्णपणे जळून खाक झाली.

दरम्यान पहाटे पाच वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने हेही घटनास्थळी दाखल झाले. विदर्भ ट्रॅव्हल्सची बस नागपूरवरुन पुण्याकडे निघाली होती. 30 जूनला नागपूरवरुन सायंकाळी 5 वाजता ही बस पुण्याकडे निघाली होती. मध्यरात्री समृद्धी महामार्गावर ही बस डिव्हायडरला धडकल्याने टायर फुटले. टायर फुटल्यानंतर ही बस उलटली. त्यानंतर काही मिनिटांतच बसने पेट घेतला. त्यांनतर गाडीचा मोठा स्फोट झाला. त्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 26 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube