Samruddhi Mahamarg : लघुशंकेला थांबणं जीवावर बेतलं, एकाच रात्री तीन अपघात…

समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याची परिस्थिती निर्माण झालीय, कारण एका रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी मोठे अपघात झाल्याची घटना घडलीय. तीन वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. Akshay Bhalerao Murder Case : आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून दलित युवकावर खंजरने वार करुन हत्या… पहिला अपघात चेनेज नंबर 283 जवळ घडला आहे. समृद्धी महामार्गावर लघुशंकेसाठी […]

Samrudhi Mahamarg

Samrudhi Mahamarg

समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याची परिस्थिती निर्माण झालीय, कारण एका रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी मोठे अपघात झाल्याची घटना घडलीय. तीन वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

Akshay Bhalerao Murder Case : आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून दलित युवकावर खंजरने वार करुन हत्या…

पहिला अपघात चेनेज नंबर 283 जवळ घडला आहे. समृद्धी महामार्गावर लघुशंकेसाठी थांबण तीन प्रवाशांच्या जीवावर बेतलं आहे. कारमधील तिघे जण लघुशंकेसाठी थांबले याचदरम्यान कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातात एकाचा जागीच तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

Letsupp Special : रेल्वे अपघाताचे ‘वंदे भारत’ कनेक्शन; मालगाड्यांचे प्रमाण अन् वाढती ठेकेदारीही मुळाशी?

तर दुसरा अपघात चालकाला अचनाक डुकला लागल्याने घडला आहे. चालकाला झोप लागल्याने ट्रक थेट महामार्गाच्या खाली कोसळला. या अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Video : राऊतांपासून एका महिलेला मूल; शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ

तसेच तिसऱ्या अपघातातही एकाचा मृत्यू झाला असून धुळे जिल्ह्यावरुन नागपूरकडे जाणारी एक कार अचानक पलटल्याची घटना घडली. कार पलटल्याने कारमधील एकाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी या दरम्यान प्रवासासाठी लागणार वेळ कमी झाला आहे. मात्र, महामार्गाच्या उद्घाटनानंतर अपघातांची मालिक सुरुच आहे. त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version