Video : राऊतांपासून एका महिलेला मूल; शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ

  • Written By: Published:
Video : राऊतांपासून एका महिलेला मूल; शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Sanjay Sirsat On Sanjay Raut : शिंदे गटाचे खासदार संजय शिरसाट यांनी राऊतांपासून एका महिलेला मूल झालेले आहे असा गंभीर आरोप केला आहे. याबाबत आपल्याकडे व्हिडिओदेखील असल्याचा दावा शिरसाटांनी केला आहे. त्या महिलेला संजय राऊतांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती असेही शिरसाट म्हणाले. ज्या महिलेला संजय राऊतांपासून मूल झाले आहे, त्या माऊलीचे नाव मी घेऊ इच्छित नाही. मात्र, हे प्रकरण जगजाहीर आहे. शिरसाटांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसात हे प्रकरण समोर येईल असा इशारा दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शिरसाटांच्या या दाव्यावर आता राऊत काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Coromandel Express Accident : 42 वर्षांमधील भारतातील सर्वात मोठे रेल्वे अपघात, उत्तर प्रदेशमध्ये झाली सर्वाधिक हानी

काय म्हणाले शिरसाट? 

पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की,  संजय राऊत गेल्या दोन दिवसांपासून थुंकण्याचा प्रकार करत आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणातला इतका बिनडोक माणूस पहिल्यांदा पाहिल्याचे म्हणत राऊतांचं मानसिक संतुलन बिघडल्याचे ते म्हणाले. या माणसाचं कुणाशी जमत नसल्याचेही शिरसाटांनी यावेळी सांगितले. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे गटाचा काय संबंध आहे, पक्ष आमच्या बापाचा या भाषेत राऊत बोलतात. आम्ही गद्दारी केली नाही, तुम्ही गद्दारी केल्याचा पुनुरूच्चारही यावेळी शिरसाटांनी केला.  एका आंदोलनाचा फोटो दाखवावा असे म्हणत, त्यांनीच उद्धव गटाला संपवायचे कॉन्ट्रक्ट घेतले आहे. प्रसिद्धीसाठी हे सर्व सुरू आहे, याशिवाय त्यांचे पोट भरत नाही. मी थुंकू शकतो, जोरात थुंकू शकतो मग त्यांच्यात अन माझ्यात फरक काय असेही शिससाट म्हणाले.

विनोद तावडेंची नाथाभाऊंना आर्त हाक; खडसे राष्ट्रवादी अन् आमदारकी सोडणार?

‘धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं’

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ऑन कॅमेरा थुंकण्याच्या कृतीमुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राऊतांच्या या कृतीवर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ही आपली संस्कृती नाही वागताना बोलताना तरतम्य बाळगायला हवे असा सल्ला दिला. त्यावर राऊतांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी राऊतांच्या थूंकण्यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोललं पाहिजे, असे अजितदादा म्हणाले होते. यावर आता राऊतांनी धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं, असे म्हणत अजितदादांना डिवचले आहे.

‘त्यांच्या बोलण्यानं आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत’; अजितदादांचा राऊतांवर पलटवार

पंकजा मुंडेवर काय म्हणाले शिरसाट 

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपात नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. त्यात दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील एका कार्यक्रमात मी भाजपची पण भाजप पक्ष कुठे माझा आहे असे विधान करत वडिलांशी जर भांडण झाले तर, भावाच्या घरीदेखील जाऊ शकते असे सूचक विधान केले होते. त्यानंतर त्या जानकरांच्या रासप किंवा राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पंकजांच्या या विधानावरही यावेळी शिरसाटांनी भाष्य केले. ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांचे 6 ते 8 महिन्यात असे स्टेटमेंट येतात आणि नंतर त्या म्हणतात मी जे बोलले त्याचा अर्थ जो तो त्यांच्या हिशोबाने घेतो. हा भाजपचा अंतर्गत प्रश्न यावर आम्ही बोलण उचित नाही. एकनाथ खडसे भेटले तरी त्यांच नात वेगळ आहे असे म्हणत पंकजा मुंडे आमच्याकडे आल्या तर, आम्ही स्वागत करु. भाजप शिवसेनेची युती असून, आम्हाला मिळूनच काम करायचे आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube