प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी)
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल हल्ला करण्यात आला. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात त्यांच्यावर अज्ञातांनी स्टंम्पने हल्ला केला. देशपांडे हे सातत्याने माध्यमांसमोर मनसेची भूमिका मांडत असतात. तर कोण आहेत संदीप देशपांडे? ते मनसेत कसे आले? हे या लेखातून जाणून घेऊ या.
शिवसेने मधून फुटून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी महारष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी संदीप देशपांडे एक कार्यकर्ते म्हणून बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यासोबत कायम सोबत असत. छोटी मोठी आंदोलन करणे, पत्रकार यांचा गोतावळा संभाळणे ही भूमिका संदीप देशपांडे पार पाडत असत. नंतर काही दिवसांनी मनसेची एक लाट मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात आली. यावेळी मनसेचे १३ आमदार निवडून आले . याच वेळी महानगर पालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या.
त्यावेळी अशी चर्चा आहे की राज ठाकरे यांचे अत्यंत विस्वासू म्हणून यशवंत किल्लेदार आहेत. सतत राज ठाकरेबयांच्यासोबत सावली सारखे ते राहिले. तेंव्हा नितीन सरदेसाई आमदार होते. किल्लेदार हे राज यांच्या जवळ असल्याने त्यानं शह म्हणून सरदेसाई यांनी संदीप देशपांडे यांना नगरसेवक बनवले. मनसेत प्रमोट करण्यास सुरुवात केली.
देशपांडे मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक झाले. त्यांची विविध विषयांवर झालेली आंदोलने हे कायम प्रसिद्धीच्या झोतात राहिली. सभगृहात केलेल्या भाषणांची दखल घेतली जाऊ लागली. पुढे संदीप देशपांडे हे पक्षाची भूमिका मांडू लागले. नितीन सरदेसाई यांच्या पेक्षा संदीप देशपांडे हे दादर मतदार संघावर दावा करतात का? अस चित्र उभ राहिल. येथून संदीप देशपांडे यांच्या राजकिय कारकीर्दीला ब्रेक लागला. देशपांडे यांचा नगरपालिकेत पराभव झाला.
आता उद्भव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर मनसेतून थेट टीका होत नाही . ही भूमिका आता संदीप देशपांडे पार पाडत आहेत. राज यांचे कट्टर समर्थक यशवंत किल्लेदार यांना सोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने जंग जंग पछाडले आहे. पण त्याना यश आले नाही. यशवंत किल्लेदार हे विभागप्रमुख आहेत. पण तळागाळत असलेला नेता आणि कार्यकर्ता देखील आहे. किल्लेदार असेपर्यंत तरी संदीप देशपांडे यांना या ठिकाणी दुय्यम भूमिका वठवावी लागणार आहे.