Sanjay Gandhi National Park : राज्यात एकीकडे 29 महानगरपालिकांमध्ये महापौर कुणाचा होणार याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून बोरिवलीती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात अदिवासी समाजाकडून तीव्र आंदोलन सुरु आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अदिवासींना घरे रिकामी करण्यासाठी वन विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. या विरोधात गेल्या काही दिवसांपासून अदिवासी समाजाकडून जोरदार विरोध होताना दिसत आहे.
आज अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईवरून (Borivali) वनविभाग अधिकाऱ्यांमध्ये आणि स्थानिक रहिवाशांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या कारवाई दरम्यान पोलिसांवर आणि वन विभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यात आल्याने परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. परिसरात परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त (Sanjay Gandhi National Park) तैनात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे ही कारवाई न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया वनविभागाकडून देण्यात आली आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, आज (27 जानेवारी) सकाळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील हद्दीतील उभारलेली अनधिकृत घरे आणि शेड हटवण्यास वनविभागाने सुरुवात केली असता या कारवाईला स्थानिकांनी विरोध करत आम्ही वर्षानुवर्षे येथे वास्तव्यास आहोत असं म्हणत नोटीस न देता कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला. यानंतर पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली.
7 टाके असूनही रणवीर सिंहने कोलकात्याच्या हावडा ब्रिजवर केला दमदार डान्स
