Sanjay Kakade Exclusive Interview : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच राजीनामा देणार असून त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान होणार असं म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच आता भाजप नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावे अशी माझी इच्छा आहे असं म्हटले आहे. लेट्सअप मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलताना संजय काकडे यांनी अनेक धक्कादायक खुलासे करत देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावे असं म्हटले आहे.
सध्या भाजपमध्ये देश पातळीवर पंतप्रधान पदासाठी अनेक इच्छुक आहे. प्रत्येकाचा एक टर्म असतो. मोदी साहेबांचा देखील एक टर्म आहे. जे आज नाहीतर उद्या संपेल. मी आभार मानतो हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांचा की त्यांनी पंतप्रधान पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव घेतले कारण महाराष्ट्राचा पंतप्रधान होणे गरजेचे आहे. फडणवीस विरोधकांना एक शब्द देखील वाईट बोलत नाही. देवेंद्र फडणवीस शिक्षित आहे. त्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यानंतर पंतप्रधान होण्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रबळ दावेदार आहे. त्यांनी परदेशातून शिक्षण पूर्ण केले आहे. त्या दृष्टीकोनातून देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावे ही माझी पण इच्छा आहे. ही प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तीची इच्छा असेल असं या मुलाखतीमध्ये बोलताना माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) म्हणाले.
तसेच राहुल गांधी पंतप्रधान होणार नाही हे मान्य केल्याने मी हर्षवर्धन सपकाळ यांचा आभार मानतो असेही संजय काकडे म्हणाले. माझ्यासाठी पक्ष म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. ते जेव्हा निर्णय घेणार तेव्हा माझा राजकीय पुनर्वसन होणार असेही यावेळी संजय काकडे म्हणाले.