ज्या गद्दारानं सरकार पाडलं त्याच्या छताखाली बैठका कशाला? संजय राऊतांचा थेट पवारांवर हल्लाबोल

Sanjay Raut angry on Sharad Pawar शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये बैठक घेतली. यावरून ठाकरेंची शिवसेना नाराज झाली आहे.

Sanjay Raut Angry On Sharad Pawar

Sanjay Raut Angry On Sharad Pawar

Sanjay Raut angry on Sharad Pawar for meeting in Eknath shindes cabine : शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची काल बुधवारी विधानसभेमध्ये भेट झाली. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये बैठक घेतली. यावरून ठाकरेंची शिवसेना नाराज झाली आहे. त्यात ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी नाराज होत थेट शरद पवारांवर या बैठकीवरून हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

ज्या गद्दारांनी सरकार पाडलं त्याच्या छता खाली जाऊन बैठका कशाला? असा सवाल विचारत संजय राऊत पुढे म्हणाले की, आशा बैठकांमुळे मोठ्या नेत्यांविषयीचा आदर कमी होतो. गद्दाराला प्रतिष्ठा का देता? शरद पवारांना बैठक घेण्यासाठी राष्ट्रवादी भवन, सेना भवन कमी पडलं होतं का? अशाप्रकारांमुळे राष्ट्रवादीची विश्वासार्हता कमी होत आहे. अशी कडवट टीका संजय राऊतांनी केली आहे.

Exit mobile version