मुंबई : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा आहेत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) म्हटले आहे. कर्जमाफीबाबतच्या कोकाटे यांच्या विधानानंतर राऊतांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांच्या या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात शाब्दीक वाद उफळण्याची शक्यता आहे. ( Sanjay Raut Attack On Agriculture Minister Manikrao Kokate )
मनसैनिकांनो, तुर्तास आंदोलन थांबवा! राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश; पत्रात नेमकं काय?
काय म्हणाले राऊत?
नाशिक जिल्ह्यात अवकाळीची पाहणी करताना कर्जमाफीबाबत प्रश्न करणाऱ्या बळीराजालाच सुनावल्याचं समोर आले आहे. कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडा करता अशा शब्दत कोकाटेंनी कर्जमाफीबाबत विचारणाऱ्या करणाऱ्या शेतकऱ्याला सुनावले. कोकाटेंच्या या विधानानंतर वातावरण तापले असून, संजय राऊत यांनी कोकाटेंची तुलना स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamara) यांच्यासोबत केली आहे. मध्यंतरी कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन गीत सादर केले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण तापले असून, कामरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता राऊतांनी कोकाटेंना कृषिक्षेत्रातील कुणाल कामरा म्हणत डिवचले आहे.
Karuna Munde Exclusive : लव्ह स्टोरी ते हेट स्टोरी अन् पुरावे ते प्लॅन करूणांनी काय काय सांगितलं?
माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे राजकारणामध्ये अनेक वर्ष आहेत. त्यांनी अशी शेतकऱ्यांना दुखावणारी विधानं करू नये. अजित पवारांनी प्रफुल पटेल, माणिकराव कोकाटे अशा लोकांना लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही. तिघांची जर भाषण ऐकली तर त्यांनी एक कॉमेडी शो सुरू केला आहे. स्वतः अजित पवार कॉमेडी शो करत असल्याचे राऊत म्हणाले. त्यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत पटेल ते देखील कॉमेडी करत आहेत. राज्याचे कृषिमंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करत आहेत. काय चाललं आहे या राज्यात ? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.
ईडीने नऊ महिने आत ठेवलेल्यांनी बोलताना भान ठेवावे; राष्ट्रवादीचा प्रवक्ता राऊतांवर बरसला
सरकार अन् कोकाटे सत्तेच्या मस्तीत
माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांना उद्देशून केलेल्या विधानानंतर विरोधकांनी यावरून सरकारला धारेवर धरण्यास सुरूवात केली आहे. सरकार आणि कृषिमंत्री कोकाटे हे दोघेही सत्तेच्या मस्तीत असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तर, कोकाटे यांनी नेमकं काय वक्तव्य केलं माहीत नाही पण, शेतकऱ्यांचा सन्मान करणं आमचं कर्तव्य असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय साममत यांनी म्हटले आहे.
कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडा; अवकाळीची पाहणी करतांना कोकाटेंनी शेतकऱ्यांना सुनावलं
कर्जमाफीचा प्रश्व विचारला अन् कोकाटेंनी सुनावलं
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक जिल्ह्यात गेले होते. त्यावेळी तेथे उपस्थित एका शेतकऱ्याने कोकाटे यांना शेतकरी कर्जमाफीबाबत विचारलं. ‘अजितदादा बोलले की कर्जमाफी होणार नाही, रेग्यूलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का?’ असं शेतकरी कोकाटे यांना उद्देशून म्हणाला. त्यावेळी त्यांनी पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता. तोपर्यंत कर्ज भरत नाही, असं कोकाटे यांनी म्हटलंय. तसंच कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडा करता असंही ते शेतकऱ्याला उद्देशून म्हणाले.
‘माझ्या नादाला लागू नको’, नागडा करेन; राऊतांच्या धमकीनंतर प्रफुल पटेलांची प्रतिक्रिया समोर…
कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाचीतरी गुंतवणूक आहे का?” असा सवाल करत सरकार शेतकऱ्यांना शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत. सिंचनासाठी पैसे आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा,” असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं.