Download App

इस्लामिक रिफायनरीसाठी सरकार लोकांची हत्या करतयं; राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut On Shinde Goverment :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून बारसू येथे रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी आंदोलक व पोलिस यांच्यामध्ये संघर्ष देखील दिसून येत आहे. यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मला आश्चर्य वाटत आहे की, काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल घेऊन सांगत होते, बार्शीच्या आंदोलकांवर अजिबात लाठीचार्ज झाला नाही. सर्व काही शांतीने सुरू आहे. पण आपण पाहिलं असेल बार्शीच्या आंदोलकांवर ती महिला असो किंवा वृद्ध त्यांच्यावर लाठीमार केला. आता मुख्यमंत्र्यांचे अधिकारी खोटी माहिती देतात. काही झालं नाही असं सांगतात. एक तर मुख्यमंत्री डोळे झाक करत आहेत किंवा मुख्यमंत्र्यांची प्रशासनावरती अजिबात पकड नाही. अधिकारी त्यांना फसवत आहे. खोटी माहिती देत आहेत. जर मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती जिल्हाधिकारी देत असतील तर त्यांना ताबडतोब बदललं पाहिजे, अशा शब्दामध्ये राऊतांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले आहे.

दोन ठिकाणी भाजप, संगमनेरमध्ये थोरात गट आघाडीवर

देवेंद्र फडणवीस हे परदेशात आहे. तिथून ते वेगळे आदेश देत आहेत. काही झालं तरी आंदोलकांना वरती खेचून फरफटत बाहेर काढा. हे कोण सांगत आहे? तर जे मॉरिशसला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण करायला गेलेले देवेंद्र फडणवीस सांगत आहे. मुख्यमंत्री बोलत आहेत लाठी हल्ला झाला नाही. मी आदेश दिलेला नाही. अशाप्रकारे हा गोंधळ सुरू आहे, अशी टीका राऊतांनी सरकारवर केली आहे.

अजित पवारांनी घेतली गौतमीची बाजू; म्हणाले, ‘बैलासमोर नाचू दे किंवा…’

तेथील 70 टक्के लोक आमच्या बाजूने आहेत. कसला सर्वे केला? लोक इथं मरण्यासाठी रस्त्यावर का उतरले आहेत? समन्वय कोणाशीच नाही आहे या सरकार मध्ये. हे हिंदुत्ववादी सरकार एका इस्लामिक रिफायनरीसाठी रत्नागिरीतील मराठी माणसांची, भूमिपुत्रांची बेदम निर्घृण हत्या करत आहेत, असा आरोप राऊतांनी केला आहे.

Tags

follow us