दोन ठिकाणी भाजप, संगमनेरमध्ये थोरात गट आघाडीवर

  • Written By: Published:
'थोरात दुसऱ्यांची तळी उचलण्यात धन्यता मानतात', महसूलमंत्री विखेंचा खोचक टोला

Apmc Election ahmednagar: जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी सुरू आहे. हाती आलेल्या कलानुसार पाथर्डी, नगर बाजार समितीमध्ये भाजपचा गट आघाडीवर आहेत. तर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात राखतील असा कल आहे. थोरात गटाने चार जागा जिंकल्या आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अद्याप येथे खातेही उघडलेले नाही.

Maharashtra APMC Election Result LIVE updates : राज्याच्या कल कोणाकडे? कोण राखणार सत्ता

पाथर्डी बाजार समितीमध्ये आमदार मोनिका राजळे गटाचे सात उमेदवार आघाडीवर आहेत. तर नगर बाजार समितीमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले गटाने खाते उघडले आहे. या ठिकाणी कर्डिले गटाने दोन जागा जिंकल्या आहेत. इतर जागांवर उमेदवार आघाडीवर आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीला झटका मानला जात आहे. कर्जत बाजार समितीमध्ये आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्या गटात जोरदार चुरस दिसून येत आहे.

अजित पवारांनी घेतली गौतमीची बाजू; म्हणाले, ‘बैलासमोर नाचू दे किंवा…’

तर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्यांदा राधाकृष्ण विखे यांनी पॅनल दिला आहे. त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात व विखे गटात जोरदार चुरस होईल अशी राजकीय चर्चा होती. परंतु या ठिकाणी थोरात गट सर्वच जागांवर आघाडीवर आहे.

Tags

follow us