अजित पवारांनी घेतली गौतमीची बाजू; म्हणाले, ‘बैलासमोर नाचू दे किंवा…’
Ajit Pawar took Gautami Patil’s side and said, let her dance in front of the bull or… : मागील काही दिवसांपासून डान्सर गौतमी पाटील (Dancer Gautami Patil) अनेक कारणांमुळं चर्चेत आहे. ती अश्लील नृत्य करते, असा आरोप तिच्यावर झाला होता. त्यामुळं तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी मागणीही अनेकांनी केली होती. या वादात अजित पवार यांनीही उडी घेतली होती. लावणी किंवा इतर कोणतेही कार्यक्रम सर्वांना पाहता येतील, अशा प्रकारे आयोजित केले पाहिजे. या कार्यक्रमांत अश्लील गोष्टी घडता कामा नयेत, अशी तंबी त्यांनी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा अजित पवारांनी (Ajit Pawar) यु-टर्न घेत गौतमी पाटीलची बाजू घेतली आहे.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तूफान गर्दी होते. तिच्या कार्यक्रमाच्या वेळी पोलिसांना चाहत्यांना आवरही घालावा लागतो. पण, आपल्या डान्स आणि एक्स्प्रेशन्समुळं सोशल मीडियावर आजही प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. दरम्यान, गौतमी पाटीलच्या नृत्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती बैलासमोर नाचताना दिसली होती. कार्यक्रमाच्या वेळी गौतमीच्या स्टेजच्या समोर एक बैल बांधला होता आणि त्यापुढे ती नाचत होती.
सावळा गोंधळ..! ‘Adipurusha’च्या पोस्टरमधील सीतामातेबद्दलची ‘ती’ चूक सुधारली
दरम्यान, या घटनेवरून आता अजित पवार यांना पत्रकारांनी विचारला होता. यावर बोलतांना अजित पवारांनी फटकेबाजी केली. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला ते म्हणाले की, तुला का वाईट वाटतं…. ती बैलासमोर नाचेल किंवा आणखीण कोणासमोर नाचेल, पण याचा तुला काय त्रास होतो… बैल काय गाईसमोर नाचू देत… तिचा तो हक्क आहे. डान्स, लावणी हेच गौतमीचा व्यवसाय आहे. तिच्य उपजिविकेचे साधन आहे. कला आणि अभिनयाच्या माध्यमातून लावणीकडे बघते, अशी शब्दात गौतमीची बाजू घेतली.
ते म्हणाले, समजा उद्या बाळाचे बारसं आहे आणि त्याला अजून काहीच कळत नाही, तरी देखील बारशाच्या कार्यक्रमाला गौतमीला बोलावलं तर ते येईल… तिला लावणी करेलच. मग बैलाचा वाढदिवस असो किंवा बैलपोळाच्या शर्यतीत बैलगाडा पहिला आला असो, तिचे ते कामच आहे, असे देखील पवार म्हणाले आहेत. अजित पवारांच्या या फडकेबाजीमुळं उपस्थितींमध्ये हशा पिकला होता.