सावळा गोंधळ..! ‘Adipurusha’च्या पोस्टरमधील सीतामातेबद्दलची ‘ती’ चूक सुधारली

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 29T104731.213

Adipurusha: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurusha) हा सिनेमाचा टीझर (Movie Teaser ) प्रदर्शित झाल्यापासून जोरदार चर्चेत आहे. रामायणावर (Ramayana) आधारित असलेल्या या सिनेमात प्रभास, कृती सेनॉन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत चाहत्यांना दिसणार आहेत. रामनवमीच्या मुहुर्तावर सिनेमाने पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी सिनेमातील हनुमानाचा लूक समोर आला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by ADIPURUSH (@officialadipurush)


आता ‘आदिपुरुष’ मधील सीतामातेचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘आदिपुरुष’ सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉन सीता ही भूमिका साकारली आहे. या सिनेमातील तिचा पहिला लूक समोर आला आहे. या पोस्टरमध्ये कृती सीतामातेच्या वेशात चाहत्यांना दिसून येणार आहे. भगव्या रंगाची साडी तिने परिधान केली आहे. तिचे डोळेही थोडे पाणावले असल्याचे दिसून येत आहे.

‘आदिपुरुष’मधील सीतामातेच्या या लूकने सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आदिपुरुष’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यावर चाहत्यांनी सीतामातेच्या भांगेत कुंकू नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. नुकत्याच प्रदर्शित केलेल्या या पोस्टरमध्ये ही चूक सुधारण्यात आले आहे.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

सीतामातेच्या भूमिकेमध्ये असलेल्या कृतीच्या भांगेत कुंकू असल्याचे पोस्टरमध्ये बघायला मिळाले होते.‘आदिपुरुष’ सिनेमा येत्या १६ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात प्रभास श्रीराम ही भूमिका साकारत असल्याचे दिसून येणार आहे. तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या सिनेमात हनुमानाची भूमिका साकारली आहे.

Tags

follow us