Download App

Sanjay Raut : गडकरी दिल्लीत नको म्हणून आताच त्यांचा पत्ता कट करण्याचं षडयंत्र; राऊतांचा भाजपवर घणाघात

Image Credit: Letsupp

Sanjay Raut : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांना भाजपने पहिल्या यादीत स्थान न दिल्याने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भविष्यात कोणी सर्व मान्य उमेदवार म्हणून गडकरींचे नाव कोणी पुढे केले. तर त्यावेळेला नितीन गडकरी दिल्लीत असू नये. म्हणून गडकरींचा पत्ता आताच कट करण्याचं हे भाजपच षडयंत्र आहे. असा आरोप राऊत यांनी केला आहे.

यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ची गाडी सुसाट, तर ‘लापता लेडीजच्या कमाईला ब्रेक

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, नितीन गडकरींना का डावलले आहे हे आजच्या सामना संपादकीयमध्ये स्पष्ट लिहिले आहे. गडकरी हे स्पष्ट वक्ते आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. त्यामुळे ते दिल्लीची गुलामी पत्करणार नाही. असा त्यांचा स्वभाव आहे.आम्ही त्यांच्या सोबत जवळून काम केले आहे.

“खासदार होऊन तु्मच्यापासून दूर गेलो, दोन महिन्यांनंतर इकडेच येतो”; सुजय विखेंच्या मनात काय?

गडकरी विकासाला महत्त्व देतात. ते ढोंगबाजी आणि फसवणुकीला महत्त्व देत नाहीत. आज जो देशाचा विकास दिसत आहे. त्या सगळ्यात जास्त योगदान गडकरी सांभाळत असलेल्या मंत्रालयांचे आहे. अशा व्यक्तीला भविष्यात दिल्लीमध्ये जर पुन्हा संधी मिळाली तर 2024ला भारतीय जनता पक्षाला अजिबात बहुमत मिळण्याची शक्यता नाही. भारतीय जनता पक्ष 220, 225च्या पुढे जागा जिंकणार नाही.

दिग्दर्शक नीलेश नवलाखा यांच्या पुढच्या ‘किमिदिन’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

अशा वेळेला सर्व मान्य उमेदवार म्हणून गडकरींचे नाव कोणी पुढे केले. तर त्यावेळेला गडकरी दिल्लीत असू नये म्हणून गडकरींच्या पत्ता आताच कट करण्याचा हे षडयंत्र आहे. चार दिवसांपूर्वी गडकरी शेतकऱ्यां बाबत स्पष्ट बोलले होते मजूर आणि कष्टकरी हा दुःखी आहे समाधानी नाही. कोणत्या मंत्र्याची स्पष्ट बोलण्याची हिंमत आज आहे का?

गडकरी व्यासपीठावर देखील स्वाभिमानाने आणि ताठ मानेने उभे असतात. राजनाथ सिंग यांच्यासारखा हार गळ्यात घालायचा अमित शहा यांनी डोळे वटारले की लांब व्हायचे हे उद्योग गडकरी यांनी केल्याचे आम्ही कधी पाहिलेले नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रात मराठी बाणा जपणाऱ्या या नेत्याला अपमानित करायचे, डावलायचे आणि आपल्या पायाशी आणायचं अशा प्रकारचे हे षडयंत्र आहे. कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाला नाही तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे. असं म्हणत गडकरींच्या उमेदवारीवरून राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

follow us

वेब स्टोरीज