Sanjay Raut on Deepak Kesarkar : छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील पुतळा कोसळल्यानंतर राज्यासह देशभरात शिवप्रेमी आणि सर्वच स्तरात एक संतापाची लाट आहे. त्यावरून राजकीय वातावरणातही चांगलाच भडका झालाय. (Deepak Kesarkar) विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार घणाघात सुरू आहे. दरम्यान, शिंदे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर म्हणा्ले वाईटातून चांगलं घडायचं असेल, त्यामुळे हा पुतळा कोसळला. त्यांच्या या विधानाचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांत समाचार घेतलाय.
महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला; इव्हेंटजीवी सरकार आहे, शिवरायांच्या पुतळ्यावरून जयंत पाटालांची टीका
शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला या घटनेने महाराष्ट्राच्या मनाला जखम झाली आहे. यासाठी निषेध हा शब्दही तोकडा आहे. अशातच या माणसाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं. अशा लोकांना चपलेनं मारलं पाहिजे. ही मिंध्यांनी पोसलेली अफजलखानाची औलाद आहे. अशी माणसं मिंध्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. ही घाण आमच्याकडून गेली, ते बरंच झालं अशा शब्दांत राऊतांनी दीपक केसरकर यांच्यावर प्रहार केलाय. ही सडक्या विचारांची माणसं आहेत. यावरून यांची घाणेरडी मनोवृत्तीची दिसून येते असंही राऊत म्हणाले आहेत.
अशा घाणेरड्या मनोवृत्तीची लोक देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केली आहेत. हे देवेंद्र फडणवीस यांचंच पाप आहे. असा थेट आरोपच राऊतांनी केला आहे. हे शिवाजी महाराजांचे शत्रू का झाले? हेच कळत नाही. मिंधे आणि त्यांची टोळी पोसण्याचं काम फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या सगळ्यांनी मिळूनच पैसे खाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला, असा खळबळजनक आरोपही संजय राऊत यांनी केला. तसंच, हा पुतळा वाऱ्यामुळे पडला असं मुख्यमंत्री म्हणतात मग पुतळ्याच्या शेजारी अनेक झाडंदेखील आहेत. ते का नाही पडले असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला.
आता सिंधुदुर्गात १०० फुटांचा पुतळा उभारू शिंदे गटाच्या मंत्र्याचं मोठं विधान
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असा प्रकारे कोसळणं हा महाराष्ट्र झालेला आघात आहे. केवळ निषेध करून या विषयाची फाईल बंद करता येणार नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, हे आता उघड झालं आहे. प्रख्यात शिल्पकार रामपुरे यांनीही, हा पुतळा पडला असेल तर तो केवळ भ्रष्टाचारामुळे पडला. यावरून या पुतळ्याच्या बाधकांमात भ्रष्टाचार झाला, हे सिद्ध होतं. या भ्रष्टाचारचं ठाणे कनेक्शनदेखील पुढे आल्याचं वृत्त आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.