Sanjay Raut Criticized Mahayuti On Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार (Mahayuti Goverment) स्थापन झालंय. त्यानंतर आता नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होवून खातेवाटप देखील करण्यात आलंय. त्यानंतर नवनिर्वाचित मंत्री वेगवेगळे निर्णय घेत आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा महायुती सरकारवर निशाणा साधलाय.
सुप्रीम कोर्टाने लक्ष्मण रेषा आखली; मोकळं सुटलेल्या ईडीचे हात बांधले, काय आहेत नवे आदेश?
यावेळी माध्यमाशी बोलताना संजय राऊत यांनी लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) दीड हजार रुपये देण्यासाठी लाडक्या बहिंणीचे भाऊ आणि नवरे दारुडे करणार असल्याची टीका केलीय. राऊत म्हणाले की, ड्राय डे कमी करणार. लाडक्या बहिंणीना पैसे देण्यासाठी घराघरात दारू पोहचविण्याची योजना आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावला जातोय. अजित पवार असे करत असतील तर त्यांनी यशवंतराव चव्हान यांचे फोटो लावतात, ते पाहावे असं देखील राऊत म्हणालेत.
सभापती झाले पण विधानसभेच्या पराभवाची सल कायम; राम शिंदेंच पराभवावर मोठं वक्तव्य, म्हणाले…
संजय राऊत म्हणाले की, निवडणुकींच्या आधी मतांसाठी तुम्ही कोणते निकष लावले नाही. आता निकष लावले जात आहे. बहिणीनी चिंतन केले पाहिजे की, कोणते विष आपण आणत आहोत. काल राहुल गांधी मंडईत गेले, तेव्हा महागाई जाणवली. बीडची परिस्थिती अशी आहे की, एका जिल्ह्यात राष्ट्रपती शासन लावावे. पण अशी तरतूद आपल्याकडे नाही. बीडमध्ये मुख्यमंत्र्यांनी जायला हवं ते गृहमंत्री आहेत. त्यांच्या लाडक्या धनु भाऊसोबत जायला हवं, असं देखील राऊत म्हणालेत. बीड आणि परभणी या घटनेवर फडणवीस हे थातुर माथुर उत्तर देत आहे. बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात, परभणीचा आरोपी पोलीस दलात असल्याची टीका राऊतांनी केली.
अटल वाजपेयी यांची आज जन्मशताब्दी आहे. त्यांच्यावर बोलताना राऊत म्हणाले की, अटल जी दुसरे नेहरू होते. ते नेहरूंचे भक्त होते. स्वतः नेहरू यांनी अटल जी यांना आशीर्वाद दिले. राज धर्माचं पालन कसे करायचं, हे अटल जी यांच्याकडून शिकावं. जोपर्यंत अटल जी यांच्याकडे भाजप होतं, तेव्हा एक सर्वसमावेशक होतं. पण आता बघा. बाळासाहेब यांच्यासाठी अटल जी आणि अटल जी यांचा शब्द बाळासाहेबांसाठी मानला जात होता, असं देखील संजय राऊत म्हणालेत.