Sanjay Raut : केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनाचा अजेंडा मात्र जाहीर केलेला नाही. यावरून विरोधी पक्षांनी सरकावर जोरदार टीका सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही मोदी सरकारला टोले लगावले आहेत. हे बारशाचं की लग्नाचं निमंत्रण आहे?, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.
राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. मोदी सरकारला टार्गेट करताना त्यांनी ‘इंडिया’ नाव हटवण्याचाही मुद्दा उपस्थित केला. राऊत म्हणाले, सरकारनं अचानक विशेष अधिवेशन का बोलावलं आहे? फक्त अनन्यासाधारण परिस्थितीतच अधिवेशन बोलावलं जातं. हे निमंत्रण बारशाचं आहे का?, लग्नाचं आहे का?, मोदींचा वाढदिवस साजरा केला जातोय की भाजपचा निरोप समारंभ आहे?, या अधिवेशनाचा अजेंडा नक्की काय आहे?, हे देशात काय सुरू आहे?, असे सवाल राऊत यांनी केले.
Maratha Reservation : मोठी बातमी ! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांचे पथक दाखल
तुम्ही संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलंय. तुम्ही तुमचा कार्यक्रम का लपवता?, एवढं देशात काय गोपनीच चाललंय?, ही कोणती हुकूमशाही आहे? संसदेच्या अधिवेशनाचा कार्यक्रम सांगितला जात नाही. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटलाय. याविषयी आवाज उठवायचा आहे. महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ आहे, हे मुद्दे आम्ही मांडू शकतो की नाही, असाही सवाल राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला.
एक देश एक निवडणूक (One Nation One Election) हा एक मोठा घोटाळा आहे. या सरकारने मागील नऊ वर्षांच्या काळात घोटाळे केले. त्यातलाच हा एक घोटाळा आहे. देश लुटण्याचा आणि देशाला खड्ड्यात घालण्याचाच हा प्रकार आहे, अशी जहरी टीका राऊत (Sanjay Raut) यांनी केली. देशात महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी हे मुद्दे तसेच आहेत. इंडिया नाव बदलून लपवाछपवी चालणार नाही, असेही राऊत म्हणाले.
‘चोर मंडळातील एक मोदी लंडनच्या पार्टीत’.. ठाकरे गटाची मोदी सरकारवर आगपाखड