Download App

देवेंद्र फडणवीस यांना माझं आवाहन आहे की बीडचं…संजय राऊत यांचा देशमुख हत्येवरून घणाघात

अजित पवारांनी भारतीय संविधानातला इंडियन एव्हिडन्स अॅक्ट बदलला का? हे त्यांनी सांगावं. अजित पवार हे अॅक्सिडेंटल नेते आहेत.

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut on Santosh Deshmukh Case : आम्हाला पुराव्यांशिवाय तुरुंगात टाकलं होतं. त्यावेळी अजित पवार काही बोलले नाहीत. नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्याविरोधात पुरावा नाही वगैरे काहीही अजित पवार बोलले नाही. आम्हाला गाडायचं आणि आता धनंजय मुंडेंच्या प्रकरणात पुरावा शोधायचा, बीडमध्ये खेळ चालला आहे लोकांना फसवण्याचा. ज्या पद्धतीने आरोपी, पोलीस आणि राजकारणी यांचे फोटो समोर येत आहेत. (Sanjay Raut ) बीडच्या संतोष देशमुख प्रकरण तपासाचा फार्स चालला आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझं आवाहन आहे की बीडचं पोलीस खातं बरखास्त करा आणि संतोष देशमुख प्रकरण बीडच्या बाहेर चालवा असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणालेत.

तपास ही धूळफेक

अजित पवारांनी भारतीय संविधानातला इंडियन एव्हिडन्स अॅक्ट बदलला का? हे त्यांनी सांगावं. अजित पवार हे अॅक्सिडेंटल नेते आहेत. ईव्हीएमच्या कृपेने त्यांना जागा मिळाल्या आहेत. अजित पवार जर नेते असते तर त्यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून वगळलायला हवं होतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संतोष देशमुख प्रकरणाचा तपास ही धूळफेक आहे, आत्तापर्यंत वाचवण्याचेच प्रकार सुरु आहेत. सुरेश धस बोलतात आणि माघार घेतात. सुरेश धस यांनी महाराष्ट्राला बीड पॅटर्न नावाचा कलंक लागतो आहे तो पुसण्यासाठी सामान्य माणूस म्हणून उभं राहिलं पाहिजे, आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी आहोत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा सस्पेन्स संपला; कॅबिनेट बैठकीला जाण्यापूर्वी स्वतः केला खुलासा

भाजपा हा आमचा सर्वांचा राजकीय शत्रू आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएचा पराभव इंडिया आघाडीने केला. आम्ही एक होतो त्यामुळे लोकसभेला आम्ही चांगल्या जागा मिळवल्या. दिल्लीत दुर्दैवाने हे चित्र दिसत नाही. दिल्लीत तस दिसत नाही. तेथील गव्हर्नर आणि अमित शाह यांच्या तसंच मोदींच्या हाती आहे. भाजपाचा पराभव करण्यासाठी आपसातले मतभेद विसरुन एकत्र येणं गरजेचं होतं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

देशद्रोही म्हणणं योग्य नाही

मला आश्चर्य वाटतं आहे लोकसभेला आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढले होते. आमच्या व्यासपीठावर अरविंद केजरीवाल आले होते. दिल्लीत काँग्रेस पक्षाने केजरीवाल यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न चालवला आहे त्या गोष्टीला शिवसेनेचं समर्थन नाही. आम्ही एकत्र आहोत. एकत्र राहिलं पाहिजे. टीका वगैरे होऊ शकते, राजकीय विरोध होऊ शकतो. पण अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला देशद्रोही ठरवणं योग्य नाही. असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

 

follow us