Download App

सावरकर अन् बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार का दिला नाही?, राऊतांनी थेट कारणं सांगितलं

महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये बस सेवा बंद आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, बेळगाववरुन लोक आले होते. मातोश्रीवर गेले,

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut : मुख्यमंत्री भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाऊल उचलत असतील, तर स्वागत आहे. त्यांचं ते योग्य पाऊल आहे. आम्ही त्याचं स्वागत केलं आहे. फक्त ओएसडी संदर्भात कुठल्या पक्षाच्या कुठल्या मंत्र्याने शिफारस केली, त्यांची नाव समोर येऊ द्या असं संजय राऊत म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

मिशन टायगर! पुण्यातील बड्या नेत्याचं बंड रोखण्यासाठी ठाकरेंचा हुकमी एक्कामैदानात

महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये बस सेवा बंद आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, बेळगाववरुन लोक आले होते. मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरेंना भेटले. शिवसेना भवनात आम्हाला भेटले. सुप्रीम कोर्टात खटला आहे. काँग्रेस-भाजप कोणाचही सरकार असो, बेळगावातील मराठी माणसांना त्रास देणं हाच उद्देश आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये बेळगावसाठी स्वतंत्र खातं आहे अशी आठवणही राऊतांनी सांगितली.

एकनाथ शिंदे यांना तिथे पाठवा. मुख्यमंत्र्यांनी स्वत: तिथे जाऊन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललं पाहिजे. कर्नाटकात दोन दगड पडणार असतील, तर महाराष्ट्रात दहा दगड पडणार. हेच करत बसायचं का?. आमच्या कर्नाटकी बंधुंची इथे महाराष्ट्रात हॉटेल्स आहेत असंही राऊत म्हणाले.

याचा खुलासा आम्ही भविष्यात मागू’

भारतरत्न पुरस्काराची प्रतिष्ठा वाढवायची असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन प्रखर हिंदुत्ववादी नेत्यांना भारत रत्न पुरस्कार दिला पाहिजे. पंतप्रधान नेरंद्र मोदी-अमित शाह हे स्वयंभू आहेत. हा विषय त्यांच्या सरकारच्या अख्त्यारितील आहे. मोदींनी सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांना भारत रत्न पुरस्कार का दिला नाही? याचा खुलासा आम्ही भविष्यात मागू असं संजय राऊत म्हणाले.

मंत्रिमंडळातील 24 मंत्र्यांची नावं देणार

नरेंद्र मोदी यांनी चार दिवसांपूर्वी बिहारच्या भागलपूरमध्ये एक भाषण केलं. भ्रष्टाचारावर हल्ला केला, मी कोणाला खाऊ देणार नाही असं म्हणाले. जनतेला आवाहन केलं की, मला नावं कळवा, मग मी पुढे पाहतो. आम्ही त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 24 मंत्र्यांची नावं देणार आहोत. बघू, मोदी पुढे काय करतात. मोदींना नावं कळवायची गरज नाही. मोदींना माहित आहे, मागच्या तीन वर्षात महाराष्ट्र कोणी लुटला? असं संजय राऊत म्हणाले.

follow us