Download App

Maharashtra Assembly : दादा भुसेंनी संजय राऊतांची थेट चाकरीच काढली…

मुंबई : भाकरी मातोश्रीची खातात अन् चाकरी शरद पवारांची करत असल्याचा टोला मंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विधानसभेतच लगावला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे दादा भुसेंवर घोटाळा आरोप केला आहे. चौकशीत आरोप जर खरे निघाले तर आमदारकीचाच नाहीतर राजकारणातून राजीनामा देणार असल्याचं चॅलेंजही त्यांनी यावेळी दिलंय.

मुंबईतील आणखी एक सरकारी कार्यालय दिल्लीला; हा महाराष्ट्र द्रोह नाही का? काँग्रेसचा भाजपाला सवाल

दादा भुसे म्हणाले, हे लोकं भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी शरद पवारांची करतात आणि हे आम्हाला शिकवतात, या शब्दांत त्यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय. एवढंच नाहीतर संजय राऊत यांनी मालेगावच्या नागरिकांची माफी मागावी, नाहीतर बाळासाहेब ठाकरे, दिघेसाहेबांचे हे शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नसल्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

तसेच आम्हाला नेहमी गद्दार म्हणणारे आमच्याच मतावर निवडून गेलेले हे महागद्दार लोकं आहेत. जगाच्या पाठीवर कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून हे ट्विट केलं आहे याची चौकशी करावी अन् खरं आढळलं तर मी आमदारकी नाहीतर राजकारणाचा राजीनामा देणार असल्याचं दादा भुसेंनी स्पष्ट केलं आहे.

‘लव्ह जिहादचा’ वाद पेटणार?; पत्रकार परिषदेत व्हिडिओ सादर करत नितेश राणेंचे खळबळजनक खुलासे

दरम्यान, दादा भुसे यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता मात्र, विधानसभेच्या अध्यक्षांच्या मध्यस्थीने गोंधळ बंद झाला. त्यानंतर पुन्हा सभागृहाचं कामकाज सुरु करण्यात आलंय. आमच्या मतांवरच हे महागद्दार निवडून आले आहेत, त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केलीय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या सुनावणीत आणखी एक तारीख, ‘या’ तारखेला पुढील सुनावणी

संजय राऊतांचे आरोप :
मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांकडून गिरणा अॅग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स गोळा केले आहेत. पण संबंधित कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवण्यात आले आहेत. ही एक मोठी लूट असून त्याचा लवकरच स्फोट होणार आहे.

दरम्यान, सत्तासंघर्षानंतर राज्यात शिंदे-ठाकरे गटातील नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु असल्याचं दिसून येत आहे. मात्र, शरद पवार यांची चाकरी करण्याच्या वक्तव्यानंतर आता नव्या वाद पेटणार सुरुंग लागणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगलीय.

Tags

follow us