Sanjay Raut on Devendra Fadanvis for Raj Thackeray and Udhhav Thackeray Allince : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंना युतीसाठीचा प्रस्ताव ठेवला आहे. महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनीही भूमिका मांडली आहे. त्यावर लगेचच माझ्याकडून भांडण नव्हतीच मिटून टाकली चला असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या युतीच्या टाळीला उद्धव ठाकरेंची प्रति टाळी दिली आहे. यावरून आता संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
काही लोकांना भाऊ एकत्र आलेले नको असतात. त्यामुळे ते काटे मारतात. मात्र राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी साद घातली त्याला लगेच उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला. यात कोणत्याही अटी शर्ती नाही तर जनभावना आहेत. दोन भावांची सहमती होते त्यात वाद-विवाद करणे योग्य नाही. असं म्हणत संजय राऊतांना मनसे नेते संदीप देशपांडेंवर टीका केली.
ट्रम्प सरकारविरोधात पुन्हा आंदोलन, हजारो नागरिक रस्त्यावर; अमेरिकेत काय घडतंय?
तसेच ते म्हणाले की, देशपांडेंसारखे लोक जर या भावांच्या एकत्र येण्यावर वाद घालत असतील तर असा वाद घालणं महाराष्ट्र द्रोह्यांच्या पथ्यावर पडणारं आहे. त्यामुळे महाराष्ट्र द्रोही कोण आहे? अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदेंना संताप होणार तसेच देवेंद्र फडणवीस यांनी जरी दोन भाऊ एकत्र येण्यावर आनंद व्यक्त केला असला तरी भाजपच्या पोटात एक अन् ओठात एक असतं त्यामुळे राज-उद्धव ठाकरेंच्या युतीवरून शिंदेंप्रमाणे फडणवीसांचा देखील संताप झालाय पण ते दाखवणार नाहीत. अशी टीका राऊत यांनी केली आहे.