ट्रम्प सरकारविरोधात पुन्हा आंदोलन, हजारो नागरिक रस्त्यावर; अमेरिकेत काय घडतंय?

ट्रम्प सरकारविरोधात पुन्हा आंदोलन, हजारो नागरिक रस्त्यावर; अमेरिकेत काय घडतंय?

Protest Against Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) सत्तेत येताच अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. परंतु, ट्रम्प प्रशासनाचे निर्णय आणि धोरणांमुळे अमेरिकन जनतेत मात्र संतापाची लाट उसळली आहे. अमेरिकेत सध्या व्यापक प्रमाणात निदर्शने होत आहेत. आंदोलकांचे म्हणणे आहे की लोकांची नाराजी मोठ्या आंदोलनात नक्कीच परिवर्तित होईल. काल शनिवारी सुद्धा हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून रॅली काढली. यात राष्ट्रपती ट्रम्प यांच्या धोरणांचा जोरदार विरोध करण्यात आला.

याआधी 5 एप्रिल रोजी न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, शिकागो शहरात आंदोलन झाले होते. यावेळच्या गर्दीच्या तुलनेत काल झालेल्या आंदोलनात गर्दी कमी होती. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार फ्लोरिडातील जॅक्सनवीलपासून लॉस एंजेलिसपर्यंत देशभरात तब्बल 400 रॅली काढण्याची योजना आखण्यात आली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध आंदोलने करण्यात येत आहेत. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून देशातील हे चौथे मोठे आंदोलन होते. याआधी 17 फेब्रुवारी रोजी नो किंग्स डे आंदोलन झाले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’ ब्रेक मागे वेगळाच प्लॅन; चीनवर दबाव अन् जगभरात बिजनेस डील..

आंदोलकांच्या मागण्या काय

आंदोलकांचे म्हणणे आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या हुकूमशाही कारभारापासून देशातील लोकशाहीचं संरक्षण झालं पाहिजे. प्रवक्ता हीदर डीन यांनी सांगितलं की आमचं आंदोलन शांतीपू्र्ण आहे. कुणालाही नुकसान पोहोचवण्याचा आमचा उद्देश नाही. देशाला जोडणे आणि देशाच्या संविधानाचं रक्षण करणे हा या आंदोलनांमागचा उद्देश आहे. या आंदोलनात डेमोक्रॅट, इंडिपेंडंट आणि रिपब्लीकन सगळेच एकत्र येत असल्याचे त्यांनी सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारताच संपूर्ण जगालाच डोकेदुखी ठरणारे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या टॅरिफ धोरणाचा अर्थव्यवस्थेवर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला आहे. शेअर बाजार गडगडला. बेरोजगारीत वाढ झाली आहे. सरकारी नोकऱ्यांतही कपात झाली आहे. मानवाधिकारांवर प्रश्न आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध यामुळे अमेरिकेतील लोकांत संताप वाढला आहे. या कारणांमुळे लोकांनी आंदोलन सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.

डोनाल्ड ट्रम्प अन् एलन मस्क यांच्याविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर; कारणही धक्कादायक.. 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube