चीनची डोकेदुखी वाढणार! चीनी जहाजांवर तीन वर्षांसाठी नवा टॅक्स; ट्रम्प सरकारची घोषणा

US China Trade War 2025 : अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने चीनला झटका देणारा (US China Trade War) आणखी एक निर्णय घेतला आहे. चीनी जहाजांवर नव्या पोर्ट टॅक्सची घोषणा सरकारने केली आहे. यामुळे चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्ध अधिक चिघळण्याची शक्यता आहे. यूएस ट्रेड रिप्रेजेंटेटिव (USTR) कडून जारी करण्यात आलेल्या योजनेवनुसार हा कर चीनी मालकीच्या, संचालन किंवा निर्माण जहाजांवर लागू होणार आहे.
यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी 14 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार आहे. म्हणजेच आणखी पाच महिन्यांचा काळ बाकी आहे. सध्या जी व्यवस्था आहे त्यानुसारच कामकाज सुरू राहणार आहे. एप्रिल 2028 पर्यंत या करात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 50 डॉलर प्रति दिवस टॅक्स चीनी जहाजांना द्यावा लागेल. यानंतर यात वाढ होऊन हा टॅक्स 140 डॉलर प्रति दिवस असा होईल. याशिवाय प्रति कंटेनर टॅक्स 120 डॉलर्सवरुन 250 डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता राहील.
धक्कादायक! तैवानच्या सैन्यात चीनची घुसखोरी; पोलखोल झाल्यानंतर उडाली खळबळ
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा तिळपापड
एससीएमपी अनुसार चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी अमेरिकेच्या या निर्णयावर कठोर शब्दांत टीका केली आहे. अमेरिकेचा हा निर्णय जागतिक पुरवठा साखळीत अडथळा, खर्चात वाढ आणि अमेरिकेतील नागरिकांवर महागाईचा भार पडणार आहे. अमेरिकी सरकारचे हे धोरण जहाज निर्माण उद्योगात कोणतीही नवी सुधारणा घडवून आणू शकणार नाही. यूएसटीआरच्या योजनेनुसार प्रत्येक जहाजाकडून एका वर्षात जास्तीत जास्त पाच वेळा टॅक्स वसूल केला जाईल.
ज्या ठिकाणी एखादे जहाज प्रथमच अमेरिकेत प्रवेश करेल त्याठिकाणच्या बंदरावर हा टॅक्स वसूल केला जाईल. तज्ज्ञांच्या मते, अमेरिका सरकारच्या या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम चीनच्या प्रमुख शिपिंग कंपन्यांवर होणार आहे. यामध्ये COSCO, OOCL या प्रमुख कंपन्यांवर पडेल. यामुळे कंपन्यांवर टॅक्सचा भार वाढणार आहे.
अमेरिकी जहाजाच्या ऑर्डरवर सूट
अमेरिका सरकार एलएनजीवर चालणाऱ्या गाड्या आणि विदेशी निर्मित वाहन ट्रान्सपोर्टसवर सुद्धा टॅक्स आकारण्याच्या तयारीत आहे. विदेशी ऑटोमोबाइल वाहकांना प्रति युनिट 150 डॉलर टॅक्स द्यावा लागेल. ही सवलत कालावधी संपल्यानंतर लागू होणार आहे. खरंतर यूएसटीआरने काही प्रकरणात दिलासाही दिला आहे. लहान आकाराचे जहाज आणि कमी अंतराच्या प्रवासावर सूट देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त एखादा ऑपरेटर वस्तूचा आकाराचे अमेरिकी जहाज ऑर्डर केले तर त्याला चीनी जहाजावर टॅक्सवर सवलत मिळेल.