Download App

अजितदादा राष्ट्रवादीतच मात्र…राऊतांचे सूचक विधान

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut On Ajit Pawar :  ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याविषयी मोठे विधान केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर नवीन अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरु झाली आहे. अशातच संजय राऊत यांनी अजित पवारांविषयी एक विधान केले आहे.

अजितदादा हे राष्ट्रवादीतच आहेत मात्र राजकारणात काहीही होऊ शकतं, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. तसेच सुप्रिया सुळे केंद्रात तर अजितदादा हे राज्यात स्थिर आहेत, असे विधान त्यांनी केले आहे. अजित पवार वारंवार सांगत आहेत की मी राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे त्यांच्याविषयीच्या या चर्चांना पूर्णविराम दिला पाहिजे, असे राऊत म्हणाले आहेत.

Sharad Pawar यांची निवृत्तीची घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार

आजच्या दैनिक सामनाच्या अग्रलेखामध्ये देखील राऊतांनी याविषयी भाष्य केले आहे. पक्षातील ईडी यंत्रणेमुळे असलेली अस्वस्थता हे शरद पवारांच्या राजीनाम्याचे कारण आहे का किंवा अजित पवार व त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी हा प्रयत्न केला आहे का, असे राऊतांनी आपल्या अग्रलेखामध्ये म्हटले आहे. तसेच या सर्व गोष्टींविषयी माध्यमांमध्ये चर्चा आहे. त्यावरुन मी हा प्रश्न उपस्थित केल्याचे राऊतांनी म्हटले आहे.

अजितदादा राष्ट्रवादीतच मात्र…राऊतांचे सूचक विधान

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर नवीन अध्यक्ष कोण होणार याबाबत अनेक चर्चा केल्या जात आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. मी दिल्लीत काम करु शकत नाही. माझ्या दिल्लीत ओळखी नाहीत. मी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकत नाही, असे ते म्हणाले आहेत. तसेच शरद पवार हे त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत, असे पाटील यांनी म्हटले आहे.

Tags

follow us