Sanjay Raut on Shivsena MP Sanjay Jadhav after Manoj jarange criticism : परभणीतील नियोजित शेतकरी मेळावा रद्द करण्यास खासदार संजय जाधव ऊर्फ बंडू जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी नकार दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. त्या कार्यक्रमानंतर जाधव यांनी जरांगेंची माफीही मागितली. मात्र आता यावरून संजय राऊतांनी जाधवांवर निशाणा साधला आहे.
जरांगेंच्या जाधवांवरील टीकेवर राऊत म्हणाले…
मनोज जरांगे हे प्राण पणाला लावून आंदोलन करत आहेत. अशावेळी मराठवाड्यात वातावरण तप्त असताना परभणीतील मेळावा टाळावा, अशी भूमिका जरांगे पाटील यांची होती. संजय जाधव यांना निवडून आणण्यासाठी जरांगे पाटील यांची मदत झाली होती. जे कुणी बंडू-झंडू जाधव आहेत, जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? ते नेहमी नवीन आई-बाप शोधत असतात. ठाकरेंशी गद्दारी केली, हीच त्यांची मोठी चूक आहे. त्यांच्याकडून जरांगे पाटील यांनी काय अपेक्षा करावी? जरांगे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. ते पुन्हा संसदेत जाणार नाहीत, याची काळजी शिवसैनिक घेतील.
मराठा आरक्षणावर राऊत म्हणाले…
मुख्यमंत्री आरक्षणाच्या विषयावर कुंपणावर बसून आहेत. त्यांनी कधीही या प्रश्नावर मार्ग काढलेला नाही. ज्युनियर मंत्री आणि मुंबईतील आमदारांना चर्चेसाठी पाठवले जाते; मात्र प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. मुख्यमंत्र्यांना वेळ काढावाच लागेल. एकाही समाजाला न्याय देण्यात ते यशस्वी झालेले नाहीत. फक्त समाजात वाद निर्माण करण्याचे काम सुरू आहे.
‘एकही बांगलादेशी फेरीवाला दिसता कामा नये’; नेवाशात किरीट सोमय्यांचा प्रशासनाला इशारा
भाजपने जातीय राजकारण करणे बंद केले पाहिजे. आगी लावण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. यांना फक्त श्रेय घ्यायचे आहे. विविध पक्षांतील प्रमुख पाच जाणत्या नेत्यांशी ते चर्चा करत नाहीत. जोपर्यंत त्यांना ही सुबुद्धी येत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना नेता मानायला तयार नाही. मागील वेळी मुंबईत त्यांची फसवणूक झाली. सरकारने चर्चेची तयारी ठेवली पाहिजे. जरांगे पाटील यांना कसे गुंडाळता येईल, यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत. कालची चीड ही फसवणुकीतून निर्माण झाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
रविवार 30 ऑगस्टला परभणीत खासदार संजय जाधव यांनी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. परभणी आणि आसपासच्या भागातून मोठ्या संख्येने शेतकरी या मेळाव्यासाठी दाखल झाले होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती. दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हा मेळावा रद्द करण्याची विनंती जाधव यांच्याकडे केली होती. मेळावा रद्द केला नाही तर आपण स्वतः तिथे येऊ, असा इशाराही जरांगे यांनी दिला होता. मात्र जाधव यांनी कार्यक्रम रद्द न करण्याची भूमिका घेतली.
शुद्धीकरणावर FIR ची मागणी करणाऱ्या राहुल गांधींवरच गुन्हा; दलितांच्याच भावना दुखावल्याचा आरोप
त्यामुळे मेळावा सुरू असतानाच खासदार संजय जाधव भाषण करत होते. याचवेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सभास्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. या मेळाव्याला गालबोट लागलं. गोंधळ निर्माण झाला आणि काही जणांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला विरोध नोंदवला.
