राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सत्ताबदल झाला पण अजूनही अनेक ठिकाणी असलेल्या नेमणुकीवरून पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गट समोरासमोर येणार आहे. त्यातच आज एक नवा वाद समोर आला आहे. आज शिंदे गटाकडून संजय राऊत यांना शिवसेना संसदीय गटनेतेपदावरून मुख्य नेते पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
संजय राऊत यांना गटनेते पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी संसदीय सचिवालयाला तसे पत्र पाठवले आहे.
चर्चा तर होणारच ! उद्धव ठाकरे-फडणवीसांची विधानभवनात एकत्र एन्ट्री
राहुल शेवाळे यांनी पाठवलेल्या पत्रानुसार संजय राऊत यांना हटवून त्यांच्या जागी खासदार गजानन किर्तीकर शिवसेना संसदीय दलाचे मुख्य नेते म्हणून नेमणूक करण्यास सांगितले आहे. आज गजानन किर्तीकर शिवसेना संसदीय पार्टीचे मुख्य नेते म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.