Sanjay Raut Press Conference : मातोश्रीवर वक्फ बोर्डाचा प्रश्न मांडत काही मुस्लिम लोकांनी आंदोलन केलं आणि घोषणाबाजी केली. हे सगळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुपारी गँगचे लोक होते. (Sanjay Raut) ते लोक सोडून इतर सगळा मुस्लिम समाज आमच्याबरोबर आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसंच, सुपारी गॅंग वर्षावर बलसलोली आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
SEBI: ..मग अध्यक्षांनी राजीनामा का दिला नाही?, राहुल गांधींची सेबी’च्या कारभारावर प्रश्नांची सरबत्ती
अर्धे लोक गुन्हेगार
आजकाल मुंबईत सुपारीचा कार्यक्रम चालला आहे. दिल्लीतून सुपारी दिली जाते, मग गोष्टी घडतात. मातोश्रीच्या बाहेर वक्फ बोर्डाच्या मागणीसाठी असेच सुपारीबाज लोक आले होते. काहींनी पैसे देऊन आंदोलनासाठी या लोकांना पाठवलं होतं. वक्फ बोर्डासंबंधीचं विधेयक हे चर्चेसाठी आलेलं नाही. अजून चर्चा झाली नाही, कुणाची मतं कळली नाहीत. तेलगुदेसमने विरोध केला आहे. मातोश्रीच्या बाहेर हंगामा करण्यात आला. त्यातले अर्धे लोक गुन्हेगार होते. ही सुपारी कुणाची होती मी तुम्हाला दाखवतो. जे १० ते १२ लोक मातोश्रीच्या बाहेर घोषणा देत होते ते सगळे मुख्यमंत्र्यांचे लोक होते. असं म्हणत संजय राऊत यांनी फोटो दाखवून थेट आरोप केले आहेत.
पारी गँग वर्षा बंगल्यावर
मातोश्रीवर जे लोक सुपारी देऊन धाडले गेले ते वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असतात किंवा ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी असतात. अकबर सय्यद आंदोलन करत होता. तो मुख्यमंत्र्यांबरोबर आहे बघा. सलमान शेख हा कुणाबरोब आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर. त्यानंतर सिद्दीकी नावाचा माणूस हा पण एकनाथ शिंदेंसह असतो असं इस्तियाक सिद्दीकी मातोश्री बाहेर घोषणा देत होता तो मिसेस मुख्यमंत्र्यांबरोबर होता असाही फोटो संजय राऊत यांनी दाखवला. इलियास शेख मातोश्रीबाहेर घोषणा देत होता. हा मुख्यमंत्र्यांचा माणूस आहे. अक्रम शेख मातोश्री बाहेर होता, तो पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह होता. जे सगळे लोक मातोश्रीबाहेर आले होते आंदोलन आणि घोषणा देत होते. उद्धव ठाकरेंबाबत घोषणा देत होते ते सगळे लोक सुपारी गँगचे होते असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. ही सुपारी गँग वर्षा बंगल्यावर बसली आहे असंही ते म्हणाले आहेत.
अहवालात केलेले आरोप काही प्रमाणात सेबी प्रमुखांनी मान्य केले; हिंडेनबर्गच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सगळी फॅमिली सुपारीबाज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बुरखा फाटला आहे. तुम्हाला तमाशा करायचा आहे ना? आम्ही पण तुमचा तमाशा करु. एकनाथ शिंदेंचे भाडोत्री लोक मातोश्रीबाहेर नारेबाजी करत होते. सुपारी गँग मंत्रालय, वर्षा बंगला आणि ठाण्यातून चालवली जाते आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे. सगळे भाडोत्री लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पे रोलवर आहेत. बाकी सगळा मुस्लिम समाज महाविकास आघाडीबरोबर आहे असंही संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच नाहीत तर त्यांची सगळी फॅमिली सुपारीबाज आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सुपारी गँगचे मुखवटे रोज फाडले जात आहेत असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
हिंमत असेल त्यांना धमकी द्या
आम्हाला मराठी माणसांमध्ये भांडण लावायचं नाही. कुणी भांडण लावत असेल तर आम्हाला ते मान्य नाही. बघून घेऊ वगैरे धमक्या आम्हाला देऊ नका अहमदशाह अब्दालीला द्या. महाराष्ट्राची लूट करणाऱ्याला आव्हान द्या. सुपारी गँगला आव्हान देण्याची भाषा करा हिंमत असेल तर असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. सध्या आम्ही शांत बसलो आहोत. ज्याचा आमच्याशी काही संबंध नाही तर आम्ही ते मान्यच करणार नाही. महाराष्ट्र लुटणाऱ्यांना त्यांनी आव्हान द्यावं. आम्ही तुरुंगात जातोय, ईडीपुढे आम्ही शेपट्या घातल्या नाहीत. अब्दालीचे लोक आमच्या अंगावर आले तेव्हा आम्ही घाबरलो नाही असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
मातोश्रीवर वक्फ बोर्डाचा प्रश्न मांडत काही मुस्लिम लोकांनी आंदोलन केलं. त्यावरू खासदार संजय राऊत यांनी काही फोटो दाखवत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंव आरोप केले आहेत.#sanjayraut #Eknathshinde #matoshree pic.twitter.com/SlBsdX2PHb
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 12, 2024