Download App

संजय राऊतांना मोठा दिलासा, मानहानी प्रकरणात शिक्षेला स्थगिती

Sanjay Raut  : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भाजप नेते आणि माजी आमदार किरीट सोमय्या आणि

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut  : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भाजप (BJP) नेते आणि माजी आमदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्या यांची बदनामी केल्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना ठोठावलेल्या 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सत्र न्यायालयाने स्थगित केली आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

आज या प्रकरणात माझगांव कोर्टात सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण घेतल्यानंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. याच बरोबर 15 दिवासांची कोठडीची शिक्षा देखील स्थगित केली आहे. या प्रकरणात आता पुढील सुनावणी 31 जानेवारी 2025 ला होणार आहे.

नेमकं प्रकरण काय

‘सामना’मध्ये 15 आणि 16 एप्रिल 2022 मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या काही सार्वजनिक शौचालयांच्या बांधकाम आणि देखभालीच्या शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मेधा सोमय्या गुंतल्याचा आरोप करणे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. हे वृत्त वाचून धक्का बसला असं मेधा सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. तसेच संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्ये ही बदनामीकारक असल्याने त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

सोन्यात 6 कोटींची गुंतवणूक अन् 182 कोटी रुपयांचे कर्ज, मंगलप्रभात लोढांची संपत्ती जाणून घ्या

या प्रकरणात सुनावणी करताना दंडाधिकारी न्यायालयाने 26 सप्टेंबरला खासदार संजय राऊत यांना दोषी ठरवून 15 दिवसांची शिक्षा सुनावली होती. मात्र आज संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला असून शिक्षा देखील स्थगित करण्यात आली आहे.

follow us