Sanjay Raut : ठाकरे गटाचा 18 जागांवर विजय निश्चित…

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमच्या लोकसभेच्या 18 जागा असून त्या जागांवर आमचाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच संजय राऊतांनी जागांबाबतचा हा दावा केला आहे. ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ची जर्मनीत पुनरावृत्ती, दीड वर्षाच्या अरिहासाठी आईची याचना पुढे बोलताना ते […]

Sanjay Raut

Sanjay Raut

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमच्या लोकसभेच्या 18 जागा असून त्या जागांवर आमचाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच संजय राऊतांनी जागांबाबतचा हा दावा केला आहे.

‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ची जर्मनीत पुनरावृत्ती, दीड वर्षाच्या अरिहासाठी आईची याचना

पुढे बोलताना ते म्हणाले, पक्षांनी लोकसभेच्या 48 जागांचा आढावा घेतला पाहिजे. कोणत्या पक्षाची कुठे ताकद आहे. हे तपासले पाहिजे. महाराष्ट्रातच नाहीतर देशातही विचार व्हायला हवा. जो जिंकेल त्याची जागा असणार हे सुत्र असायला पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.

Wrestlers Protest : विश्वविजयी ‘टीम 83’ कुस्तीपटूंच्या पाठिशी; क्रिकेटचा ‘देव’ मात्र शांतच

मला जागावाटपासंदर्भात अधिक चर्चा करता येणार नाही. प्रत्येक पक्ष सर्व जागांचा आढावा घेत आहे. आमच्या सर्वच कार्यकर्त्यांशी चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचं जिंकण हेच लक्ष असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहेत.

Video : हवाई दलाच्या पदवीदान समारंभात अध्यक्ष बिडेन स्टेजवर पडले

तसेच यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. भाजप सोबत आलेल्या लोकांचा गळा दाबून खून करतं हा आमचा अनुभव असून आम्ही त्यातून मुक्त झालो ही ईश्वराची कृपा असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

अहमदनगर नामांतराच्या निर्णयाच स्वागत पण… जयंत पाटलांची टोलेबाजी

दरम्यान, प्रसारमाध्यमांसमोर बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता संजय राऊत थुंकल्याचं दिसून आलं आहे. यासंदर्भातला व्हिडिओदेखील चांगलाच व्हायरल झालाय. यावरही त्यांनी भाष्य करीत म्हणाले, थुंकण्यावर बंदी आहे काय? तसं असेल तर सरकारने त्याबाबतचा आदेश काढावा. माझ्या दाताखाली जीभ आली होती म्हणून मला ती कृती करावी लागली होती. मी कोणाच्या नावाने थुंकलो तो त्यांचा प्रश्न असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

Exit mobile version