‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ची जर्मनीत पुनरावृत्ती, दीड वर्षाच्या अरिहासाठी आईची याचना

‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ची जर्मनीत पुनरावृत्ती, दीड वर्षाच्या अरिहासाठी आईची याचना

Ariha Shah Case: काही दिवसांपूर्वी राणी मुखर्जीचा एका सत्य घटनेवर आधारित ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आपल्या मुलांची नीट काळजी घेत नाही, असे सांगून एके दिवशी चाईल्ड वेलफेअरवेलफेअरमधील लोक राणी मुखर्जीच्या बाळाला घेऊन जातात. त्यानंतर आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी राणी मुखर्जी नॉर्वे सरकारविरोधात संघर्ष करते. अगदी त्याच घटनेची पुनरावृत्ती जर्मनीत झाली आहे. 27 महिन्यांची अरिहा शहा जर्मनीत अडकली आहे. तिला मिळवण्यासाठी तिच्या आईचा संघर्ष सुरु आहे.

जर्मनीत अडकलेल्या गुजरातच्या अरिहा शहाचे प्रकरण पुन्हा एकदा तापले आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने मोदी सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या मुलीला 20 महिने बर्लिनमधील एका केंद्रात ठेवण्यात आले आहे. आता त्या केंद्रातून अरिहाला उचलून मंदबुद्धी केंद्रात पाठवण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मुलाची मानसिक स्थिती बिघडली आहे, असल्याचेही तिच्या आईने म्हटले आहे.

ED Raid : पुणे, अहमदनगरमध्ये व्हीआयपीएस कंपनीवर ईडीची छापेमारी !, 18 कोटींवर टाच

त्याचबरोबर या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने बेबी अरिहाला लवकरच भारतात परत आणण्याचे आश्वासन दिले आहे. प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, आम्ही जर्मन सरकारला मुलीच्या ताब्यात देण्याची विनंती केली आहे. अहमदाबादची अरिषा शहा गेल्या 27 महिन्यांपासून जर्मनीमध्ये आहे. जेव्हा ती 7 महिन्यांची होती तेव्हा तिला जर्मनी युथ वेलफेअरच्या कोठडीत पाठवण्यात आले. मुलीच्या पालकांवर शारिरीक अत्याचाराचा आरोप होता. मात्र, नंतर हे आरोप खोटे ठरले होते. मुलीचा ताबा मिळवण्यासाठी वडील भावेश आणि आई धारा शहा यांनी रात्रंदिवस एक केले. पण अजूनही ताबा मिळाला नाही.

सचिन वाझेच्या जामिनाला विरोध, एनआयएच्या प्रतिज्ञापत्रात खळबळजनक दावा

या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बागची म्हणाले की, आम्ही जर्मनीला मुलगी (अरिषा शहा) भारतात परत करण्याची विनंती करत आहोत. ती भारतीय नागरिक आहे. 2021 मध्ये, जेव्हा ती 7 महिन्यांची होती, तेव्हापासून तिला जर्मनीच्या युथ वेलफेअरच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे. मुलगी गेल्या 20 महिन्यांपासून केअर होममध्ये आहे.

ते पुढं म्हणाले, आमच्या दूतावासाने जर्मन अधिकाऱ्यांना वारंवार विनंती केली आहे की, आमच्या सांस्कृतिक आणि धार्मिक पार्श्वभूमीशी अरिहाचा ​​संबंध तडजोड होणार नाही. आरिहाला लवकरात लवकर भारतात पाठवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, हा एक भारतीय नागरिक म्हणून तिचा हक्कही आहे, असे आम्ही जर्मन अधिकाऱ्यांना आवाहन करतो. आरिया शहाचे भारतात परतणे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube