Download App

भुजबळांच्या आनंदावर संशोधन करा अन् त्यांना काय हवयं ते एकदाचं देऊन टाका; शिरसाटांनी कान टोचले

लोकसभा आणि राज्यसभेला छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

  • Written By: Last Updated:

छ.संभाजीनगर : लोकसभा आणि राज्यसभेला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. या नाराजी नाट्यात आता एकनाश शिंदेंचे आमदार संजय शिरसाट  यांनी उडी घेतली असून, कुणी तरी नाराज होणार आणि त्यामुळे महायुतीची प्रतिमा खराब होत आहे. त्यामुळे भुजबळांना काय हवयं ते एकदाच देऊन टाका असा सल्ला शिरसाट यांनी दिला आहे. (Shivsena MLA Sanjay Shirsat On Chhagan Bhujbal Upset)

अहमदनगरचे खासदार कुख्यात गुंडाच्या घरी; गजा मारणेकडून सत्कार, लंके वादात भोवऱ्यात

भुजबळ कोणत्या गोष्टीवर खूश होतात यावर संशोधन करा

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराजी नाट्यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी उडी घेचली आहे. ते म्हणाले की, भुजबळ नेमक्या कोणत्या गोष्टीवर खूश होतात यावर खरं संशोधन करणं गरजेचे आहे. नाराजी मतदार संघाच्यावेळी पण आतापण. खरे तर हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण अजितदादांनी या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. त्यांच्या पक्षात जरी नाराजी असली तरी, त्याचा परिणाम महायुतीवर होत असल्याचे शिरसाट म्हणाले. महायुतीला हे परवडणारे नाही. त्यामुळे भुजबळांना नेमकं काय हवे आहे ते एकदाचं देऊन टाका नाही तर, काय तो एकदाचा निर्णय घेऊन टाका असा सल्ला शिरसाटांनी अजितदादांना दिला आहे.

काय म्हणाले भुजबळ 

आज (दि.14) पुण्यात माध्यंमांशी बोलताना मला खासदार व्हायची इच्छा आहे म्हणूनच नाशिक लोकसभा लढवण्यासाठी तयार झालो होते. दिल्लीतून माझी उमेदवारी फायनल झाली होती त्यामुळे तयारीला लागालो होतो. पण महिनाभर झाला तरी माझं नाव जाहीर होईना म्हणून मी माघार घ्यायचे ठरवले. माघार घेतल्यानंतरदेखील 12 ते 15 दिवसांनंतर उमेदवारी जाहीर झाली. या सर्वाचे परिणाम जय-पराजय याच्यावर होत असतात असे भुजबळ म्हणाले.

चंद्रपूरमध्ये भाजपचा दुसऱ्यांदा पराभव… मुनगंटीवारांचा ‘तो’ निर्णय त्यांच्यावरच उलटला?

माझ्यावरील अन्यायाचा प्रश्न अजितदादांना विचारा

भुजबळांना यावेळी राज्यसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही याबद्दल नाराजी आहे का? असे विचारले असता ते म्हणाले की, मला राजकारणात 57 वर्ष झाले आहेत. अनेकवेळा असे झाले पाहिजे झाले असे वाटते. पण नेहमी मनासारखे होत नाही. काहीवेळा तडजोडी कराव्या लागतात. दोन्ही वेळेस अन्याय झाला का? याचे उत्तर अजितदादांनाच विचारा असे ते म्हणाले.

400 पारचा नारा धोका ठरेल सांगितले होते

यावेळी भुजबळांनी लोकसभा निवडणुकीत 400 पारची घोषणा धोका ठरेल असे मी सांगितले होते असे ते म्हणाले. फटका बसल्यानंतर आता एकनाथ शिंदे सांगत आहेत की, या घोषणेमुळे दलित समाज, आदिवासी समाज नाराज झाला. आता लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्यानंतर संघाकडून नाराजी व्यक्त होत आहे. संघाचे नाराज होणे स्वाभाविक असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

follow us

वेब स्टोरीज