Download App

Sanjay Shirsath : स्वाभिमान गाडला गेला, आता लोकांची पालखी वाहावी; शिंदेंच्या आमदाराचा ठाकरेंना टोला

Sanjay Shirsath : शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार (Sanjay Shirsath) आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी हिंदू शौर्य दिन का साजरा केला नाही? यावर प्रश्न विचारला असता. ठाकरेंनी हिंदूत्व केव्हाच सोडलं आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्याने त्यांचा स्वाभिमान गाडला गेला आहे. त्यांनी आता लोकांची पालखी वाहावी. अशी टीका शिरसाट यांनी केली. ते माध्यामांशी बोलत होते.

शिंदेंच्या आमदाराचा ठाकरेंना टोला…

उबाठा गटाचे ते हिंदूत्ववादाचे दिवस गेले. ते आता सर्वधर्म समभाव झाले आहेत. त्यामुळे आता जर त्यांनी हिंदूत्वाबद्दल बोललं हिंदू शब्द जरी त्यांनी वापरला. तर कॉंग्रेस राष्ट्रवादी काय म्हणेल? इतके दिवस लोक त्यांचे बटिक होते. आता हे लोकांचे बटिक झाले आहेत. त्यामुळे त्यांचा तो अभिमान तो स्वाभिमान गाडला गेला आहे. त्यांनी आता लोकांची पालखी वाहावी. अशी टीका शिरसाट यांनी केली. ते माध्यामांशी बोलत होते.

Sanjay Raut : उद्धव ठाकरे PM पदाचा चेहरा? राऊतांनी ‘सस्पेन्स’ ठेवला कायम

दरम्यान यावर्षी शिवसेनेच्या शिंदे गटाने देखील हिंदू शौर्य दिन साजरा केलेला नाही. त्यावर पत्रकारांनी विचारले असता. शिरसाटांनी सारवासारव केली. ते म्हणाले हिंदू शौर्य दिन हा वेगळा विषय आहे. तो विशिष्ट ठिकाणी साजरा केला जातो. तसेच आज महापरिनिर्वाण दिन आहे. तसेच त्यांनी म्हणजे ठाकरेंनी केलेल्या गोष्टी आम्ही करत नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चालतो.

मराठा आरक्षणासाठी शेवटची ‘सर्वोच्च’ संधी : सुनावणी पूर्ण, निकालाची प्रतिक्षा, धाकधूक वाढली!

तसेच यावेळी शिरसाटांनी संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून देखील सुनावले आहे. ते म्हणाले की, त्यांनी दिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना पोहोचलं आहे की नाही हे माहित नाही. दिल्लीला एवढ्या चकरा मारता,पवारांच्या सिल्व्हर ओकवर जाता मग मुख्यमंत्र्यांच्या हातात पत्र दिले असते. पत्र कसे पाठवले आहे त्याची कल्पना पण दिली नाही. असं शिरसाट म्हणाले.

Tags

follow us