Download App

शिंदे गटाच्या आमदाराच्या घरावर चोरट्याने मारला डल्ला

MLA Sanjay Shirsath : सर्वसामान्य मानस तसेच श्रीमंतांच्या घरी चोरी झाल्याच्या अनेक घटना आजवर तुम्ही ऐकल्या असतील. मात्र इथं तर चक्क एका सत्ताधारी आमदाराच्या घरावर चोरट्याने हात साफ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे आमदार दुसरे कोणी नसून संजय शिरसाट हे आहे. मिळालेल्या माहितीनुसार आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या राहत्या घराच्या परिसरात चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी सातारा परिसरातील गट क्रमांक 92 मधून पाच लाख रुपये किंमतीची, शिरसाट यांच्या मुलीच्या नावावर असलेली ट्रॅक्टर-ट्रॉली चोरून नेले आहे.

दरम्यान आता थेट लोकप्रतिनिधींच्या घरावर चोरटे डल्ला मारू लागले आहे. सत्ताधारी आमदाराचाच ट्रॅक्टर चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाठ (वय 32 वर्ष, रा. बीड बायपास रोड छत्रपती संभाजीनगर) यांच्या तक्रारीवरून शहरातील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इथे लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसले तर ते लोकांचे प्रश्न काय मांडणार अशा चर्चा परिसरात रंगल्या होत्या.

याप्रकरणी सिद्धांत संजय शिरसाठ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 3 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास सातारा परिसरातील तंत्रनगर येथे त्यांच्या बहिणीच्या नावे असलेला महिंद्रा ट्रॅक्टर कोणेतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेला. अंदाजे पाच लाख रुपये किमतीची ट्रॅक्टरसह ट्रॉली चोरून नेल्याचं तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणी सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चाबूकस्वार यांच्याकडे देण्यात आला आहे. तर पोलिसांकडून आता चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहर आणि ग्रामीण भागात चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध देखील घेतला जात आहे. मात्र चोरांनी थेट आमदार शिरसाट यांचाच ट्रॅक्टर चोरी केल्याने खळबळ उडाली आहे. जर आमदारच सुरक्षित नसतील तर सर्व सामन्य लोकांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर आमदार शिरसाट यांचा ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या चोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर देखील आव्हान असणार आहे.

Tags

follow us