Santosh Deshmukh case Suspended police and judges together Damanias serious allegations : राज्यामध्ये खळबळ माजवणारे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दररोज याप्रकरणी काही ना काही घडामोडी घडत असतात. यादरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या प्रकरणात अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन आहेत त्यात त्यांनी आता एक फोटो पोस्ट करत खळबळ जनक दावा केला आहे. संतोष देशमुख प्रकरणानंतर निलंबित करण्यात आलेले पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले प्रशांत महाजन यांनी न्यायालयाच्या न्यायाधीशांसोबत धुळवड खेळली. याचा एक फोटो दमानिया यांनी पोस्ट करत खळबळ जनक दावा केला आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
बीडच्या केसमध्ये जे दोन अधिकारी होते. ज्यांना आम्ही सहआरोपी करा. अशी मागणी वारंवार केली होती. राजेश पाटील जे 29 नोव्हेंबर ज्यावेळी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये खंडणीची मागणी झाली होती. त्यावेळी जे अधिकारी उपस्थित होते. ते राजेश पाटील आणि जे पदोपदी आरोपींना मदत करत होते ते प्रशांत महाजन एवढेच नाही तर ते तिरंगा रेस्टॉरंटमध्ये देखील उपस्थित होते.
मोठी बातमी! रशिया युक्रेन युद्ध थांबणार; ट्रम्प यांचा प्रस्ताव रशियाला मान्य..
हे दोन्ही अधिकारी आज थेट न्यायालयाच्या न्यायाधीशांसोबत केज या ठिकाणी होळी खेळताना दिसतात. असे काही मेसेजेस आणि व्हिडिओ फोटो मला आले. ते पाहून मला प्रचंड आश्चर्य वाटलं. हा विषय अत्यंत गंभीर आहे. कारण न्यायाधीशांकडे पद्धतशीर वागण्याची अपेक्षा असते. त्यांच्यासाठी एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट ठरलेला असतो. ज्यामध्ये न्यायाधीशा न्यायाधीशांनी न्यायिक कार्याची प्रतिष्ठा राखणे, निष्पक्षता राखणे, न्यायिक जीवनाच्या मूल्यांची पुनर्रचना आणि इतर संबंधित मार्गदर्शक तत्वांप्रमाणे निष्पक्ष कारवाई निश्चित करणे, तसेच न्यायाधीशांनी न्यायालयात आणि बाहेर नैतिक वर्तनाचा सर्वोच्च मानांक राखला पाहिजे. हे अपेक्षित असतं. त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणाची जी सुनावणी सध्या ज्यांच्यासमोर सुरू आहे. त्यांनी या प्रकरणातील निलंबित आणि सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या अधिकाऱ्यांना भेटणं किंवा त्यांच्यासोबत होळी खेळणं अत्यंत चुकीचा आहे. असा आरोप दमानिया यांनी केला आहे.
“उत्तर भारतीयांना मुलं जन्माला घालण्याशिवाय दुसरं..” तामिळनाडूच्या मंत्र्याची जीभ घसरली
दुसरीकडे संतोष देशमुख हत्याकांडाने आख्खा महाराष्ट्र ढवळून निघालेला आसताना आज धुरवडीला केज शहरातल्या साई नगर येथे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील साहेब व याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन साहेब हे धुरवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेत. अन संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिस सुधिर भाजीपाले साहेब हे साई नगर केजमधेच राहतात पण या हत्या प्रकरणात संशयीत आरोपी आसलेले यांच्या सोबत रंगाची उधळण करताना दिसत आहेत. आता यांचे जर या आरोपीला वाचणारे हे निंलबित आधिकारी सोबत यांचे लागेबांधे आसल्यावर संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपीला शिक्षा होईल का ? असा प्रश्न आता कूटूंबियांकडून उपस्थिती केला जात आहेत.