मोठी बातमी! रशिया युक्रेन युद्ध थांबणार; ट्रम्प यांचा प्रस्ताव रशियाला मान्य..

मोठी बातमी! रशिया युक्रेन युद्ध थांबणार; ट्रम्प यांचा प्रस्ताव रशियाला मान्य..

Russia Ukraine War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्यात युद्ध समाप्तीच्या (Russia Ukraine War) दिशेने सकारात्मक चर्चा झाली. पुतिन यांनी ट्रम्प यांना  (Donald Trump) एक मेसेज देत युद्धविरामाच्या बाबतीत दोन्ही देशांत सहकार्य होईल अशी शक्यता व्यक्त केली. यानंतर ट्रम्प म्हणाले, की रशियन सैन्याने हजारो यु्क्रेनी सैनिकांना  (Ukraine War) घेरले आहे आणि ते अत्यंत कमजोर स्थितीत आहेत. या सैनिकांना जीवनदान द्या अशी विनंती ट्रम्प यांनी केली.

युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी आधीच हा प्रस्ताव स्वीकारला आहे. यानंतर आता पुतिन यांनी सैद्धांतिक रुपाने प्रस्ताव मान्य केला आहे. रशियाने गुरुवारी कराराच्या संदर्भात सहमती व्यक्त केली. परंतु, युद्धविरामाच्या अटी अजून तयार झालेल्या नाहीत यावर पुतिन यांनी जोर दिला. विचार चांगला आहे आणि आम्ही याचे समर्थन करतो. परंतु, काही मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे. आमचे अमेरिकी सहकारी आणि भागीदारांसोबत चर्चा झाली पाहिजे असे पुतिन यावेळी म्हणाले.

अमेरिकेने युक्रेनला धक्का दिलाच! संयुक्त राष्ट्रांत चक्क रशियाला साथ; नेमकं काय घडलं?

याच दरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की म्हणाले की यु्क्रेन 30 दिवसांच्या युद्धविरामासाठी तयार आहे. या काळात एक दीर्घकालीन शांतता योजना तयार करता येईल. मी युद्धविरामासाठी अतिशय गंभीर आहे आणि या युद्धाचा अंत करणे माझ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. युद्धविरामाच्या अटी कठीण आणि वेळखाऊ राहतील असा प्रयत्न रशियाकडून होतोय असा आरोप झेलेन्स्की यांनी केला.

दरम्यान, या आठवड्यात अमेरिकेने सऊदी अरब येथील जेद्दा येथे युक्रेनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. आठ तासांपेक्षा जास्त वेळ चर्चा सुरू होती. या चर्चेनंतर युक्रेनने यु्द्धविरामाचा स्वीकार केला. यानंतर अमेरिकेनेही युक्रेन बरोबर मिलिट्री आणि इंटेलिजन्स सपोर्ट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकी अधिकाऱ्यांनी रशियाच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली आहे. त्यानंतर आता ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील मेसेजिंगमुळे तीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध लवकरच थांबण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

NATO अन् UN दोघांना अमेरिकेचा बक्कळ पैसा; डोनाल्ड ट्रम्प येताच वाढली धाकधूक..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube