NATO अन् UN दोघांना अमेरिकेचा बक्कळ पैसा; डोनाल्ड ट्रम्प येताच वाढली धाकधूक..

NATO अन् UN दोघांना अमेरिकेचा बक्कळ पैसा; डोनाल्ड ट्रम्प येताच वाढली धाकधूक..

What will happen if US quit NATO and United Nations : अमेरिकेची सत्ता हातात घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) अनेकदा नाटो आणि संयुक्त राष्ट्रसंघाची (United Nations) साथ सोडण्याचे संकेत दिले आहेत. परंतु नाटोसोबत असण्याचा (NATO) दावाही ट्रम्प करत असतात. अमेरिकेने नाटो आणि संयुक्त राष्ट्रसंघातून बाजूला झाले पाहिजे असे मत ट्रम्प यांचे सहकारी एलन मस्क यांनी (Elon Musk) व्यक्त केले आहे.

आता अशी चर्चा सुरू झाली आहे की अमेरिका प्रथम या धोरणांतर्गत अमेरिका युरोप आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांचा हात सोडू शकतो का.. चला तर मग जाणून घेऊ की अमेरिकेकडून नाटो आणि संयुक्त राष्ट्रसंघाला काय काय मिळते? जर अमेरिकेने या दोन्ही संघटनांची साथ सोडली तर कुणाचे किती नुकसान होईल? आणि याचा अमेरिकेवर काय परिणाम होईल?

नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो या संघटनेची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर लगेच करण्यात आली होती. त्यावेळी 30 देशांनी एकत्र येत रक्षात्मक आणि सैन्य आघाडी तयार केली होती. त्यावेळी सोव्हिएत संघाचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि कॅनडाच्या सहकार्याने पश्चिम युरोपीय देशांनी या संघटनेची स्थापना केली होती. नाटोचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे आहे. पण अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनसह पश्चिमी देशांचा दबदबा आहे.

संघटनेच्या आर्टिकल 5 मध्ये म्हटले आहे की नाटोतील एकाही देशावर जरी हल्ला झाला तरी हा हल्ला संघटनेतील सर्व देशांवर असेल. अशा परिस्थितीत संघटनेतील एखादा देश अण्वस्त्र संपन्न नसला तरी त्याला दुसऱ्या अण्वस्त्र संपन्न सदस्य देशाकडून सुरक्षेची हमी मिळते. कारण नाटोतील फ्रान्स, अमेरिका आणि यूके यांसारखे देश अण्वस्त्र संपन्न आहेत.

भारत अन् चीनवर टॅरिफची तलवार, पाकिस्तानचे मात्र आभार; ट्रम्प यांच्या मनात काय?

नाटोचा खर्च कसा चालतो?

नाटो संघटनेचे वार्षिक बजेट तब्बल 4.1 बिलियन डॉलर्सचे आहे. हा पैसा विविध कारणांसाठी खर्च केला जातो. हा निधी सदस्य देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारावर आहे. यामध्ये सर्वाधिक योगदान देणारे तीन देश आहेत. अमेरिका आणि जर्मनी हे दोन देश मिळून 16 टक्के खर्च उचलतात. यात ब्रिटनची हिस्सेदारी 11 टक्के आहे. याआधी एकटा अमेरिका 22 टक्क्यांपेक्षा जास्त आर्थिक मदत करत होता. डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळी पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले त्यावेळीच त्यांनी सांगितले होते की अमेरिकेवर सर्वाधिक आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे सन 2019 मध्ये एक नवीन फॉर्म्युला तयार करण्यात आला.

कुणाचे होणार नुकसान? नाटोला अमेरिकेची किती गरज?

आजमितीस संपूर्ण युरोपात एक लाखांपेक्षा जास्त अमेरिकी सैनिक तैनात आहेत. यातील काही सैन्य गैर नाटो अभियानात देखील सहकार्य करतात. तसं पाहिलं तर अमेरिकी सैनिक युरोपात ये जा करत असतात. सध्या जर्मनीत सर्वाधिक (Germany) अमेरिकी सैनिक तैनात आहेत. यानंतर इटली आणि ब्रिटन या देशांत सर्वाधिक अमेरिकन सैनिक आहेत. अमेरिका जागतिक महासत्ता आहे. नाटो संघटनेतील सर्व देशांच्या जीडीपी इतका जीडीपी एकट्या अमेरिकेचा होता. संरक्षणावर अमेरिकेचा खर्च नाटोच्या एकूण खर्चाच्या दोन तृतीयांश आहे.

नाटो सदस्य देशांची शक्ती कमी होईल

यावरून लक्षात येईल की जर अमेरिकेने नाटोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर अन्य सदस्य देशांची सैन्य शक्ती कमी होईल. जर्मनीचे होणारे चांसलर फ्रेडरिक मर्ज यांनी सांगितले की जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर युरोपला बळकट करण्याची गरज आहे. जेणेकरून अमेरिकेपासून सुटका होईल. याआधीच जर अमेरिका नाटोमधून बाहेर पडला तर नाटोला होणारी आर्थिक मदत थांबेल आणि नाटोला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

“भारतीय वाईट असतात तुम्हाला..”, भारतीय नर्सला जबर मारहाण; चेहरा फ्रॅक्चर, डोळे गमावण्याचीही भीती

युरोपीय देशांसमोरचा धोका वाढणार

अमेरिका जर नाटो संघटनेतून बाहेर पडला तर याचे नुकसान अमेरिकेला देखील होणार आहे. अमेरिकी विद्यापीठातील जागतिक घडामोडींचे प्रोफेसर James Goldgeier यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की नाटोतून बाहेर पडल्यानंतर अमेरिकेकडे जागतिक नेतृत्वाची संधी नसेल. कमांड अँड कंट्रोल सिस्टीम, स्पेस वेपन्स आणि हत्यारांचा पुरवठ्याचाही पर्याय नसेल. अशा परिस्थितीत युरोपसमोरील धोका वाढेल. रशिया युरोपवर आक्रमणाच्या तयारीत राहील. यासाठी युरोप अजूनही तयार नाही आणि आगामी काळातही तयार होण्याची शक्यता नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube