“भारतीय वाईट असतात तुम्हाला..”, भारतीय नर्सला जबर मारहाण; चेहरा फ्रॅक्चर, डोळे गमावण्याचीही भीती

“भारतीय वाईट असतात तुम्हाला..”, भारतीय नर्सला जबर मारहाण; चेहरा फ्रॅक्चर, डोळे गमावण्याचीही भीती

Indian Nurse Attacked in America : अमेरिकेतील फ्लोरिडातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे भारतीय वंशाच्या महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ला करणारा दुसरा तिसरा कुणी नसून रुग्णालयातील पेशंट होता. पेशंटने केलेल्या मारहाणीत भारतीय नर्सच्या चेहऱ्याची हाडे मोडली आहेत. डोळ्यांच्या नसांना गंभीर दुखापत झाली आहे. कदाचित या नर्सला डोळेही गमवावे लागू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय लोक वाईट असतात असे म्हणत पेशंटने लीलाम्मा लाल नावाच्या भारतीय नर्सला मारहाण केली.

फ्लोरिडातील पाम्स वेस्ट येथील रुग्णालयात ही घटना घडली. नर्सला मारहाण झाल्याची माहिती WPBF या स्थानिक वृत्तवाहिनीने दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. स्टीफन स्कँटलबरी असे या हल्लेखोराचे नाव आहे. हा हल्लेखोर मानसिक रुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्लेखोराने नर्स लीला लाल यांना इतकी जबर मारहाण केली की यात त्यांच्या चेहऱ्याची हाडे तुटली आहेत. कॉलरबोन देखील तुटला आहे. डोक्यातून रक्तस्त्राव झाला. साधारण दोन मिनिटांपर्यंत मारहाण सुरू होती. ही सगळी घटना रुग्णालयाच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

या हल्ल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. त्याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हा हल्लेखोर मानसिक रुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मारहाण केल्यानंतर त्याने भारतीयांवर वर्णभेदी वक्तव्यही केले. भारतीय लोक वाईट असतात मी आताच एका भारतीय डॉक्टला मारलं आहे असे स्टीफन स्कँटलबरी म्हणाला. या घटनेनंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मु्द्दा पुढे आला आहे.

पनामा अन् कोस्टा रिका! भारतीयांना दुसऱ्या देशांत का धाडतोय अमेरिका? ट्रम्पचा प्लॅन नक्की काय?

लीला यांना अंधत्व येण्याची शक्यता

या मारहाणीत लीलाम्मा लाल गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना सध्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या चेहऱ्याची सर्व हाडे मोडली आहेत. डोळ्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. लीली यांना कदाचित त्यांचे डोळेही गमवावे लागू शकतात अशी भीती आहे. कारण त्यांच्या डोळ्यांच्या नसांना गंभीर इजा झाली आहे. त्यामुळे त्यांना कायमचे अंधत्व येऊ शकते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube