भारत अन् चीनवर टॅरिफची तलवार, पाकिस्तानचे मात्र आभार; ट्रम्प यांच्या मनात काय?

भारत अन् चीनवर टॅरिफची तलवार, पाकिस्तानचे मात्र आभार; ट्रम्प यांच्या मनात काय?

Donald Trump Speech : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) अमेरिकी काँग्रेसच्या पहिल्याच भाषणात चीन, भारत, कॅनडा, मेक्सिकोसह आणखी काही देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ आकारण्याची घोषणा केली. या दरम्यान त्यांनी एक आतंकवाद्याला पकडण्यात मदत केली म्हणून पाकिस्तानचे आभारही मानले. ट्रम्प म्हणाले, सन 2021 मध्ये जेव्हा पाकिस्तानी सैन्य अफगाणिस्तानातून माघारी येत होते त्यावेळी काबूल विमानतळावर बॉम्ब स्फोट झाले होते. या घटनेत 13 जवानांचा मृत्यू झाला होता. आयएसआयएस संघटनेच्या अतिरेक्यांनी 13 जवान आणि अनेक लोकांची हत्या केली.

अफगाणिस्तानातून माघार घेण्याची ही कोणती पद्धत होती असा सवाल करत ट्रम्प यांनी आधीच्या बायडेन सरकारवर जोरदार टीका केली. अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वाधिक लाजिरवाणा प्रसंग होता. पण आज मला एक घोषणा करताना आनंद होतोय की या अत्याचारासाठी जबाबदार असणाऱ्या एका आतंकवाद्याला आम्ही पकडले आहे. आता या दहशतवाद्याला अमेरिकी कायद्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा 11 लाख कोटींवर डोळा.. भारताला तेल देण्याची अमेरिकेला घाई

या दहशतवाद्याला पकडण्यात मदत करणाऱ्या पाकिस्तान सरकारला (Pakistan Government) धन्यवाद मानतो. हा दिवस त्या 13 कुटुंबांसाठी अत्यंत महत्वाचा आहे ज्यांना मी चांगल्या पद्धतीने ओळखतो.

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, अमेरिकेकडून जितका टॅरिफ आकारला जातो त्यापेक्षा कितीतरी जास्त टॅरिफ दुसरे देश आकारतात. भारत तर 100 टक्के टॅरिफ अमेरिकेकडून वसूल करतो. चीन दुप्पट तर दक्षिण कोरिया चौपट टॅरिफ आकारतो. दक्षिण कोरियाला तर अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात लष्करी मदत दिली जाते. तरी देखील या देशाकडून इतक्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ वसूल केला जातो. परंतु, आता येत्या 2 एप्रिलपासून अमेरिकी सरकार सुद्धा जो देश जितका टॅरिफ आकारील तितकाच टॅरिफ त्या देशावर आकारला जाईल अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.

विदेशांना मिळणारी मदत बंद

अमेरिकेकडून विविध देशांना अब्जावधी डॉलर्सची मदत दिली जाते. परंतु आता ही मदत पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या फाइलवर डोनाल्ड ट्रम्प यांनी सही केली आहे. ट्रम्प यांनी या निर्णयाची माहिती दिली. अमेरिकी नागरिकांचे पैसे अमेरिकेसाठीच खर्च केले जातील असे डोनाल्ड ट्रम्प यावेळी म्हणाले. ट्रम्प फक्त बोलूनच थांबलेले नाहीत तर याआधी त्यांनी काही संस्थांची आर्थिक मदत थांबवली सुद्धा आहे.

झेलेन्स्कीचा कॅमेऱ्यासमोर ट्रम्पशी वाद, अमेरिकेचा मोठा निर्णय, युक्रेनची आर्थिक मदत थांबणार?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube